स्टाइलिश, पण कथेत कमी पडलेला 'एजंट विनोद' - Marathi News 24taas.com

स्टाइलिश, पण कथेत कमी पडलेला 'एजंट विनोद'

www.24taas.com, मुंबई
 
दिग्दर्शक श्रीराम राघवनने यापूर्वी सैफ अली खान बरोबर ‘एक हसीना थी’ सारखा भन्नाट सिनेमा बनवला होता. ८ वर्षांनी हिच जोडगोळी 'एजंट विनोद'च्या निमित्ताने एकत्र आली खरी. पण, स्टाईलिश सिनेमा बनवण्याच्या नादात मूळ गाभाच हरवून बसली आहे.
 
एजंट विनोदची कथा खरी इंटरेस्टिंग आहे. रॉ एजंट असणाऱ्या एजंट विनोदला (सैफ अली खान) एका दहशतवादी कारवाइचा सुगावा लागतो. हा कट उलथून पाडण्यासाठी एजंट विनोद सिद्ध होतो. याच मिशनमध्ये त्याला डॉक्टर बनून वावारत असलेली पाकिस्तानच्या आयएसआयची अंडरकव्हर एजंट रुबी (करीना कपूर) भेटते. यानंतर घटना वेगाने घडू लागतात. आणि भन्नाट शेवटापर्यंत येऊन पोहोचतात.
 
सिनेमातील ऍक्शन स्टाइलिश आहे. सिनेमॅटोग्राफीही प्रेक्षणीय आहे. ९ ते १० वेगवेगळ्या देशांची नेत्रसुखद यात्रा सिनेमातून घडते. कथेतील सस्पेंस चित्तथरारक आहे. एक स्पाय फिल्म म्हणून हा सिनेमा पुरेपुर मनोरंजन करणारा आहे. पण चकचकीत मांडणी, वेगवेगळ्या हॉलिवूडपटांवर बेतलेले सीन्स यामुळे मूळ सिनेमातील कथा मनाचा ठाव घेण्यात कमी पडते. त्यामुळेच चांगला असूनही एजंट विनोद तितकंसं मनोरंजन करत नाही आणि प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात कमी पडतो.
 
**

First Published: Friday, March 23, 2012, 19:08


comments powered by Disqus