Last Updated: Tuesday, November 15, 2011, 17:29
झी २४ तास वेब टीम, मुंबई कतरिना कैफच्या शिला की जवानीने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. आता पुन्हा एकदा कतरिना करण जोहरच्या अग्निपथसाठी आयटम नंबरवर थिरकणार आहे. चिकनी चमेली या गाण्यावर कतरिना आपल्या अदाकारीचे जलवे दाखवणार आहे. येत्या आठवड्यात त्याचं शूटिंग होणार असल्याचं टविट करण जोहरने केलं.
अमिताभ बच्चनच्या १९९० सालच्या ब्लॉकबस्टर अग्निपथाचा रिमेक करण जोहर दिग्दर्शित करत आहे. आणि त्यात हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा, रिशी कपूर आणि संजय द्त्त प्रमूख भूमिका साकारणार आहेत. डॅनीने जीवंत केलेली कांचा चीनाची भूमिकेचं आव्हान संजय दत्त पेलणार आहे. पुढच्या वर्षी १३ जानेवारीला अग्निपथ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
First Published: Tuesday, November 15, 2011, 17:29