Last Updated: Sunday, March 25, 2012, 10:35
www.24taas.com 
सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा बहुचर्चित 'एजंट विनोद' हा सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर मराठीतला तीन बायका फजिती ऐका या सिनेमाला प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे.
या विकेण्डला एक्शनपॅक एन्टरटेन्मेंटचा खजिना आणला आहे एजंट विनोद या सैफ अली खानच्या सिनेमाने. एक्शनचा थरार आणि भरपूर ड्रामा असलेला सैफ-करिनाच्या ड्रीम प्रोजेक्टला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. रिअल लाईफ लव्हबर्ड्स असलेल्या सैफ-करिनाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगते हे पाहायला प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळले खरे मात्र सिनेमा फारशा अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.
तर मराठीमध्ये तीन बायका फजिती ऐका हा विनोदी मराठी चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. मकरंद अनासपुरे आणि क्रांती रेडकर, निशा परुळेकर,तेजश्री खेले हे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. तीन बायकांच्या कचाट्यात सापडलेल्या पुरुषाची रंजक कहाणी यात मांडण्यात आले आहे.

चित्रपटातील बघतोय रिक्षावाला या गाण्याने उत्सुकता आधीच वाढवली होती. मकरंदच्या या हलक्याफुलक्या विनोदी सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एकंदर या दोन फिल्म्स मुळे हा विकेण्ड तरी फिल्मी झाला आहे असंच म्हणावं लागेल.
First Published: Sunday, March 25, 2012, 10:35