सनीला प्रिय आपली 'पॉर्न स्टार' इमेजच - Marathi News 24taas.com

सनीला प्रिय आपली 'पॉर्न स्टार' इमेजच

www.24taas.com, मुंबई
 
महेश भट्ट कुठल्याही सामान्य मुलीला सेक्सी बनवून सिनेमात दाखवू शकतात असं महेश भट्ट यांचं कौतुक करताना राखी सावंतने म्हटलं खरं. पण, जर असं असेल, तर जेव्हा खुद्द पॉर्न स्टार सनी लिऑनच महेश भट्ट यांच्या सिनेमात का करत असेल तर! कल्पनाच केलेली बरी...
 
पण, पूजा भट्टच्या ‘जिस्म-२’द्वारे जरी बॉलिवूडमधून अभिनेत्री म्हणून सनी पदार्पण करणार असली, तरी आपली पॉर्न स्टार ही इमेज सोडणं सनीला आवडत नसावं, असं दिसतंय. जिस्म-२मध्ये सनी अत्यंत तोकडे आणि जास्तीत जास्त मादक कपडे घालणार असल्याचं सांगण्यात आलंय. याबद्दल सनीने ट्विट केलं आहे, “जिस्म-२ चं शुटींग १ एप्रिलपासून सुरू होतंय. :) इंडिया, तयार राहा, आम्ही येतोय.”
 
पण याच वेळी सनीने ट्विटरवरून आपल्या फॅन्सना आपल्या वेबसाइटची लिंक दाखवून आपले नग्न, अर्धनग्न फोटो पाहाण्याचीही विनंती केली. यावरून तरी असं दिसतंय की, सनीला कितीही मोठा बॉलिवूड ब्रेक दिला, तरी सनीला आपलं पॉर्न स्टार स्टेटसच लाडकं आहे.

First Published: Tuesday, March 27, 2012, 16:39


comments powered by Disqus