'चोली के पिछे'नंतर पुन्हा नग्न पॉली! - Marathi News 24taas.com

'चोली के पिछे'नंतर पुन्हा नग्न पॉली!

www.24taas.com, मुंबई
 
 
विक्रम भट्ट यांच्या आगामी ‘Hate Story’ या चित्रपटात बोल्ड सीनचे वादळ पाहायला मिळणार आहे. पॉर्न स्टार सनी लियोन, हॉट बिपाशा बसू, बिनधास्त मल्लिका शेरावत आणि मुन्नी बदनाम हुईची स्टार मल्लका अरोराला टक्कर देण्यासाठी पॉली दाम सज्ज झाली आहे. तिने चक्क अंगावरील कपडे उतरविण्याचा इरादाच स्पष्ट केला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पॉलीचे बोल्ड तूफान माजण्याची शक्यता आहे.
 
 
बंगालमधील 'Chatrak'  या चित्रपटात पॉली दामने कपडे उतरवून काम केले होते. तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. आता विक्रम भट्ट यांनी ‘हेट स्टोरी’ नावाचा चित्रपट काढला आहे. यामध्ये कपडे काढलेली पाठमोरी अभिनेत्री दाखवलेली आहे. मात्र, ही अभिनेत्री कोण आहे, याची चर्चा सुरू झाल्याने पॉली दामला एका कार्यक्रमात प्रश्नविचारण्यात आला. यावेळी मी माझी ओळख कशाला लपवू, तुम्ही थोडी वाट पाहा, असे सांगून आपणच असल्याचे संकेत दिले.
 
 
‘हेट स्टोरी’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर विक्रम भट्ट यांनी याआधी  नंदना सेन आणि शहाना गोस्वामी यांना दिले होते. परंतु चित्रपटात कपडे उतरावयाचे असल्याने ही ऑफर या दोघींनी नाकारली. मात्र, आंतरराष्ट्रीय ‘चोली के पिछे’ या चित्रपटात पॉली दामने कपडे उतरवून धमाल उडवून दिली होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊ विक्रम भट्ट यांनी पॉली दामला चित्रपटात काम दिले आणि तिला कपडेही उतरावयाला लावले. त्यामुळे या चित्रपटाचे खास आकर्षण पॉली असणार आहे, यात शंका नाही. आता आंतरराष्ट्रीय ‘चोली के पिछे’ या चित्रपटानंतर ‘हेट स्टोरी’तून बॉलिवूडचे नवे बोल्ड तूफान पॉली दिसणार आहे. सनी लियोनने ‘जिस्म-२’मध्ये कपडे काढण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे पॉली सनी लियोनला पैशासाठी चान्स देणार का?

First Published: Wednesday, March 28, 2012, 14:35


comments powered by Disqus