जॉनने असिनला प्रपोज केलं का? - Marathi News 24taas.com

जॉनने असिनला प्रपोज केलं का?

www.24taas.com, मुंबई
 
जॉन अब्राहमने असिनला अर्ध्या मल्लूशी लग्न करण्याचा सूचवलं आहे. मल्लू म्हणजे मल्याळम भाषिक होय. आता अर्धा मल्लू म्हणजे जॉन सारखा...मला कल्पना आहे की हे असं विचित्र पद्धतीने लिहिल्याने तुमचं टाळकं सटकेल पण माझा नाईलाज आहे.
 
जॉन अर्धा मल्लू आहे, त्याचे वडिल मल्याळी आहेत आणि आई पारशी आहे. आता जॉनने असिनला प्रपोज केलं आहे का? म्हणजे अजुनतरी थेट नाही. हाऊसफूल २ च्या सेटवर असिन आणि जॉनची गट्टी जमली आणि दोघांची मुळं केरळात असल्यामुळे स्वाभाविकच जवळीकही वाढली. आता ती किती वाढली आहे हे फक्त जिझस जाणो. का सिनेमा प्रमोशनचा घासून गुळगुळीत झालेला हा फंडा आहे हेही थोड्या दिवसातच आपल्याला कळेल.
 
जॉनला मल्याळम भाषा येत नाही. पण त्याने आपल्यासाठी अप्पम बनवून आणण्याची फर्माईश मात्र असिनला केली. आता प्रकरण अप्पमपर्यंत पोहचलं आहे. असिन म्हणते की केरळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी फार लाभली नाही. पण एके दिवशी मी जॉनसाठी स्वंयपाक करेल. आता हे कधी घडणार आहे तेही जिझसच जाणो.
 
पण जाता जाता जॉनने गर्लफ्रेंडशी लग्न केल्याच्या बातम्यांनी मध्यंतरी  जोर धरला होता. त्यामुळे असिनला जरी जॉनने मल्याळी माणसाशी विवाह करण्याचं सूचवलं असलं तरी त्याने प्रपोज मारलं असं म्हणणं म्हणजे अंधेरे में तीर मारण्यासारखं आहे.
 
 

First Published: Thursday, March 29, 2012, 13:02


comments powered by Disqus