Last Updated: Sunday, April 1, 2012, 12:25
www.24taas.com, मुंबई बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला रोल्स रॉईस भेट दिली आहे. मध्यंतरी एका पार्टीत किंग खानने शिरीषच्या कानाखाली जाळ काढला होता. रा-वन सिनेमावरुन शिरीषने अतिशहाणपण करत टीका करणारा ट्विट केले होते. त्यामुळे किंग खान बिथरला आणि एका पार्टीत शिरीष समोर दिसताच त्याचं माथ भडकला. किंग खानने त्याच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर मग दोघांच्या समझोता देखील झाला आणि आता किंग खानने चक्क त्याला रोल्स रॉईस ही महागडी गाडी भेट दिली आहे.
एकेकाळी फराह आणि शाहरुख एकमेकांशिवाय काम करण्याचा विचारही करु शकत नव्हते. मग त्यांच्यात दुरावा आणि वितुष्ट निर्माण झाला. रा-वनच्या ट्विटच्या निमित्ताने तर संघर्ष आणि हाणामारी देखील झाली. आता किंग खानने महागडे गिफ्ट देऊन भरपाई करण्याचा प्रयत्न केला आहे. पण शिरीषच्या कानफटात बसल्यामुळे झालेली शोभा आणि गेलेली इज्जत काही भरून निघणार नाही.
First Published: Sunday, April 1, 2012, 12:25