अर्जून-शाहरुख मैत्रीची अखेर? - Marathi News 24taas.com

अर्जून-शाहरुख मैत्रीची अखेर?

www.24taas.com, मुंबई
 
प्रियंका चोप्रा आणि शाहरुख खानमध्ये अफेअर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, त्यानंतर बरचं काही घडून गेलं असलं, तरी तो सिलसिला अद्याप चालूच आहे. या रंगतदार प्रकरणी रोज नव्या रंगाची उधळण होत आहे. आता किंग खानचा खास मित्र अर्जून रामपाल जो कायम त्याची साथ देत आला आहे त्याने मैत्री संपुष्टात आल्याचे संकेत दिले आहेत.
 
प्रियंकासोबतच्या शाहरुखच्या अफेअरमुळे त्याच्या इमेजला तडा गेला आहे आणि जवळची मित्रमंडीळीही दुरावत चालली आहेत. येत्या काही दिवसात शाहरुखला आपल्या जुन्या मित्रमंडळींची मनं वळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. आता तर रामपाल सारख्या घनिष्ठ मित्रानेही पाठ फिरवली आहे.
 
शाहरुख आणि प्रियंकाच्या अफेअर्सच्या बातम्यांना मीडियाने प्रसिद्धी देऊ लागल्यानंतर अर्जूनने किंग खानला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. पण एसआरके व्यक्तिगत बाबीं संदर्भात लोकांनी चर्चा करु नये या मताचा असल्यामुळे अर्जूनसोबतच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यामुळेच रामपालच्या विवाहाच्या वाढदिवसाला किंग खान आणि त्याचं कुटुंब गैरहजर राहिले. अर्जून रामपाल त्यामुळे खूपच दुखावला गेला आहे. एका चांगल्या मैत्रीची अखेर झाली आहे का? ते येत्या काही दिवसात कळेलच.
 
 

First Published: Tuesday, April 3, 2012, 10:21


comments powered by Disqus