कोलावेरी डी स्टार धनुष-ऐशवर्या संबंधांमध्ये कटुता - Marathi News 24taas.com

कोलावेरी डी स्टार धनुष-ऐशवर्या संबंधांमध्ये कटुता

www.24taas.com, चेन्नई
 
कोलावेरी डी या गाण्याने एकच धमाल उडवून दिली आणि त्यानंतर ऐशवर्या आर धनुषच्या 3 या पदार्पणातील सिनेमाने यशाचे दिवसही पाहिले. त्यामुळे हे दोघं आता खूप मजेत आनंदात असतील असा जर तुमचा समज झाला असेल तर तो चुकीचा आहे. सुपरस्टार रजनीकांत मुलगी असलेल्या ऐशवर्या आणि धनुष यांच्यात वितुष्ट निर्माण झालं आहे आणि त्याला कारण आहे श्रृती हसन...
 
धनुष आणि श्रृतीच्या वाढत्या जवळिकीमुळे ऐश्वर्या आणि आर धनुषच्या नातेसंबंधांमध्ये कटूता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे या दोघांच्यात विसंवाद निर्माण झाल्याच्या वृत्ताला बळकटी मिळाली आहे. धनुष, श्रृती आणि अनिरुद्ध एका रेडिओ चॅट शोमध्ये सहभागी झाले असताना ऐश्वर्या आल्यानंतर आपलं डोकं दुखत असल्याच्या कारणावरुन धनुषने तिथून काढता पाय घेतला. आता धनुषची वागणुक अशी असली तर ऐशवर्याचं टाळकं सटकणार नाही का?
 
3 च्या प्रीमियरच्या वेळेस देखील ऐश्वर्या, धनुष आणि श्रृतीच्या वागण्यातून हेच स्पष्ट झालं होतं. प्रीमियरच्या वेळेस धनुष आधी आला आणि त्याच्या पाठोपाठ श्रृती आली त्यानंतर त्या दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. काही वेळाने ऐश्वर्या दाखल झाली. प्रीमियरच्या फोटसेशनच्या वेळेसही ऐश्वर्या आणि श्रृती विरुद्ध दिशांना तोंड करुन उभ्या होत्या. आता हे कमी की काय कोलावेरी डी स्टार धनुषने ऐशवर्याबाबत केलेली काही जाहीर वक्तव्यांनी ऐशवर्या दुखावली गेली आहे. धनुष ऐश्वर्याला टाळत असल्याचंही आढळून आलं आहे. त्यामुळेच ऐश्वर्या धनुषच्या वागण्यामुळे अस्वस्थ आहे. आता श्रृतीशी असलेली जवळीक केवळ सिनेमाच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरुपाची होती हे धनुषला उमगलं तरच या तिढ्यातून मार्ग सुटू शकेल.
 
 

First Published: Tuesday, April 3, 2012, 13:55


comments powered by Disqus