'नानाचा नेम चुकला', आणि 'नाना चुकचुकला' - Marathi News 24taas.com

'नानाचा नेम चुकला', आणि 'नाना चुकचुकला'

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
चित्रपटामध्ये विविध भूमिका साकारणारा नाना पाटेकर पाचव्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झाला होता. नानानं 50 मीटर राफयल प्रोन प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र, या चॅम्पियनशिपमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
 
या चॅम्पिय़नशिपसाठी नाना गेल्या अनेक दिवसांपासून सराव करत होता. मात्र, त्याला यश आलं नाही. त्यामुळे तो निराशही झाला आहे. अस असलं तरी, शूटिंगमध्ये भारताला १५ गोल्ड मिळू शकतात असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे राय़फल शूटिंग करत राहणार असल्याचही त्यानं सांगितलं आहे.

First Published: Saturday, November 19, 2011, 12:15


comments powered by Disqus