'कोलावेरी डी' गाणं हिंसक! - Marathi News 24taas.com

'कोलावेरी डी' गाणं हिंसक!

www.24taas.com, मुंबई
 
'3' सिनेमातील कोलावेरी डी गाण्याने देशभरात धुमाकुळ घातला, ते गाणं मानसिक हिंसा घडवणारं आहे, असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? पण, असं आहे खरं. केरळ हाय कोर्टात कोलावेरी डी गाण्याविरोधात चक्क जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
 
धनुषने गायलेलं व्हाय धिस कोलावेरी डी या गाण्याचा बालमनावर विपरीत परिणाम होतो अशा आशयाची याचिका एम. माधस्वामी यांनी दाखल केली आहे.एम. माधस्वामी यांचं लाँगेस्ट स्पीच मॅरेथॉनसाठी गिमिज बुक मध्ये नाव आलं होतं. सलग ३० तास ६ मिनिटं बोलण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे.
 
अमेरिका सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार कोलावेरी डी गाण्याचे शब्द हे अत्यंत हिंसक असून ते वैचारिक आणि भावनिक हिंसेला प्रोत्साहित करतात. यासाठी ५०० हून अधिक कॉलेज विद्यार्थ्यांवर ५ वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. यातून ७ हिंसक आणि ८ अहिंसक गाण्यांचे विद्यर्थ्यांवर काय परिणाम होतात याचा अभ्यास केला गेला. हिंसक गाणी आक्रमक बनवतात. ही गाणी चिथावणीखोर असतात. आणि कोलावेरी डी गाणं हे ही अशाच प्रकारच्या भावनांना उद्दिपित करतं असं याचिकाकर्त्याचा दावा आहे. हे गाणं म्हणजे मुलींची छेड काढण्यातलाच एक प्रकार आहे आणि असं गाणं लहान शाळकरी पोरंही गातात, हे अत्यंत धोकादायक आहे, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.

First Published: Thursday, April 5, 2012, 12:44


comments powered by Disqus