बोल्ड सिनेमातून करिश्मा परत येतेय - Marathi News 24taas.com

बोल्ड सिनेमातून करिश्मा परत येतेय

www.24taas.com, मुंबई
 
विक्रम भट्टच्या 'डेंजरस इश्क' या नव्या ३-डी सिनेमातून करिश्मा कपूर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. विक्रम भट्टचा सिनेमा आहे म्हटल्यावर तो बोल्ड असणारच. आपल्या काळात करिश्मा कपूरही एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच प्रसिद्ध होती. त्यामुळे तिचं आजच्या काळातील बोल्ड सिनेमातून होणारं पुनरागमन कसं असेल, याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.
 
डेजरस इश्क हा सिनेमा बोल्ड सस्पेंस थ्रिलर आहे. यामध्ये करिश्मा कपूर सुपरमॉडेल संजनाची भूमिका साकारत आहे. संजना आपल्या नवऱ्याचा शोध घेत असताना तिच्यापुढे वेगवेगळी रहस्यं उलगडत जातात, अशी या सिनेमाची कथा आहे.
 
डेंजरस इश्कबद्दल बोलताना करिश्मा म्हणाली, “हा सिनेमा खूप बोल्ड तर आहेच, पण या सिनेमाची शैली वेगळी आहे. आज काल लोकांना मागील जन्म, टॅरो कार्ड रीडींग इत्यादी गोष्टींबद्दल आकर्षण असतं. या सिनेमात अशाच प्रकारचं रहस्यमय कथानक आहे. त्यामुळे ही फिल्म नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.”
 
 
 

First Published: Friday, April 6, 2012, 09:44


comments powered by Disqus