Last Updated: Monday, April 9, 2012, 08:30
www.24taas.com, मुंबई बच्चन कुटुंबियांना बेटी बी च्या रुपाने सुख देणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनला पुन्हा आई व्हायचं आहे. हो.... बसला ना धक्का पण हो हे खरं आहे.
बॉलिवुडवर अधिराज्य गाजविणाऱया ऐश्वर्या रायने दीर्घ काळ चालणारे बॉलिवुड प्रोजेक्ट नाकारले आहेत. ऐश्वर्याला पुन्हा आई व्हायचं आहे, त्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते. ऐश्वर्याला आई होण्याने खूप आनंद झाला आहे. त्यामुळे ती पुन्हा दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात ३८ वर्षीय ऐश्वर्याने बेटी बीला जन्म दिला. तसेच नुकतीच ती आपल्या छकुली आणि पती अभिषेकसोबत दुबईवारीही करून आली आहे.
बेटी बीने पहिली परदेशवारी केली असली तरी बेटी बीचा अजूनही फोटो मीडियामध्ये छापून आलेला नाही.
First Published: Monday, April 9, 2012, 08:30