Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:53
झी २४ तास वेब टीम, मुंबई सध्या शाहरुख खानच्या पाठी एक ना अनेक संकट उभे राहतायत. रा-वनचं कलेक्शन, समिक्षकांनी त्यावर उडवलेले ताशेरे, हे सगळं कमी म्हणून की कीय रा-वन वर जोक्सही तयार करण्यात आले. तसंच सिनेमा रिलीजपूर्वीही कॉपीराईट्सच्या मुद्द्यावरूनही चर्चेत राहिला. आता अशीच चर्चा शाहरुख खानच्या डॉन 2 सिनेमाचीदेखील होते आहे. कारण डॉन 2 सिनेमाच्या कॉपीराईट्सचा मुद्दा उपस्थित झालाय.
१९७८ मध्ये अमिताभ बच्चन स्टारर डॉनच्या रिमेकची परवानगी नरिमन फिल्म्सने दिग्दर्शक फरहान अख्तरला दिली होती.पण या सिनेमाचा सिक्वल म्हणजेच डॉन 2ची परवानगी कोणालाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे कॉपीराईट्सच्या मुद्द्यावरून या सिनेमाच्या टीमला कायदेशीर नोटीस देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र खुद्द शाहरुख खानने या गोष्टीचा इन्कार केलाय.
आता शाहरुख जरी या नोटीसचा इन्कार करत असला तरी शेवटी तो किंग खान आहे, त्यामुळे काहीही करून शाहरुख आपला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करणार हे सध्या तरी शाहरुखच्या व्यक्तव्यावरून दिसून येतंय...
First Published: Tuesday, November 22, 2011, 13:53