डेव्हिड धवन करणार 'चष्मे बद्दूर'चा रीमेक - Marathi News 24taas.com

डेव्हिड धवन करणार 'चष्मे बद्दूर'चा रीमेक

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
हिंदी सिनेसृष्टीतील एक क्लासिक सिनेमा म्हणजे 'चष्मे बद्दूर'. सई परांजपे यांचं दिग्दर्शन, फारूख शेख, दीप्ती नवल यांचा सहज सुंदर अभिनय, यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांच्या 'ऑल टाईम फेव्हरेट कलेक्शन'मध्ये आजही गणला जातो.
 
ही हलकीफुलकी कथा थेट प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडली. या सिनेमातील विनोदाच्या पंचेसने तर प्रेक्षकांना खदखदून हसवलं. फारूख शेख, राकेश बेदी, आणि रवी बासवानी या त्रयींची या सिनेमामध्ये छान भट्टी जमली. या तीन रोमिओंची कथा आपल्याला लवकरच मॉडर्न रुपात सिल्व्हर स्क्रीनवर दिसणारेय. कारण डेव्हिड धवन या सिनेमाचा रिमेक लवकरच आपल्यासमोर घेऊन येत आहेत.
 
या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. हा सिनेमा रिमेक असला तरी मूळ सिनेमातला फील तसाच ठेवून आम्ही एक फ्रेश सिनेमा करत असल्याचं डेव्हिड धवन यांनी स्पष्ट केलंय. मात्र या क्लासिक सिनेमाचं शिवधनुष्य डेव्हिड धवन यांना पेलवतं का हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल.
 

First Published: Tuesday, November 22, 2011, 13:52


comments powered by Disqus