Last Updated: Thursday, April 12, 2012, 09:25
www.24taas.com,फुकेट इंडोनेशियात ८.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे जिस्म २ फिल्मच्या शुटिंगवर परिणाम झाला आहे.ट्विटरवर महेश भट्ट यांनी स्पष्ट केलं आहे, जिस्म २च्या शुटिंगसाठी पूजा भट्ट लोकेशन पाहायला फुकेट येथे गेली आहे. तेथे त्सुनामीसारख्या मोठमोठ्या लाटा येऊन आदळत असल्याचं पूजाने कॉल करून सांगितलं.
पूजा भट्ट आपला सह-निर्माता आणि अभिनेता दिनो मोरियो जिस्म-२च्या शुटिंगसाठी फुकेट येथे लोकेशन शोधत आहेत. या सिनेमात आंतरराष्ट्रीय पॉर्न स्टार सनी लिऑन प्रमुख भूमिकेत आहे.
सिनेमाच्या सह-निर्मात्याने ट्विटरवर लहीलं आहे, की इथे त्सुनामीची पुर्वसूचना देण्यात आली असल्यामुळे आम्हा सगळ्यांना काही तास उंच जागी जाऊन थांबण्यास सांगितलं आहे. पूजा भट्टनेही ट्विट केलं, “जिस्म २साठी फुकेटमध्ये शूट करण्यासाठी आम्ही ठिकाणं शोधत होतो. पण, आता समुद्र शांत व्हायची वाट पाहात आहोत.” लवकरच जिस्म-२चं शुटिंग येथो सुरू होईल.
First Published: Thursday, April 12, 2012, 09:25