बॉलिवूडचा किंग खान अडचणीत - Marathi News 24taas.com

बॉलिवूडचा किंग खान अडचणीत

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
आयपीएल पाचचा सिझन रंगात आला असताना नवा वाद कोलकाता टीमचा मालक आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याच्यामुळे निर्माण झाला आहे. जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. मात्र, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी आज १२ एप्रिलला होणार आहे.
 
 
राजस्थान सरकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी केली आहे. ही बंदी १२ वर्षांपासून सुरू आहे. या बंदीचे शाहरूखने उल्लंघन केले आहे. याबाबतची दृश्ये दूरचित्रवाणीवरूनही दाखविण्यात आली आहेत. धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन  केल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, तक्रारीनंतर धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी आज १२ एप्रिलला होणार आहे.
 
 
शाहरूखने याचे धुम्रपान  बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्याविरोधात न्यायालयात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनाही दोषी धरण्यात आले आहे. क्रिकेट सामन्याच्यावेळी पोलिसांनी तपासणी करण्याबाबत बेजबाबदारपणा दाखवला आहे. स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी सर्वांची तपासणी होते. तसेच कोणताही ज्वलनशील  वस्तू नेण्यावर बंदी असते. मग शाहरूख याने सिगरेट कशी ओढली. त्याची तपासणी केली असती तर सिगरेट जप्त करण्यात आली असती. हे काम पोलिसांनी केलेले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे शाहरूख खानवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
 

First Published: Thursday, April 12, 2012, 13:04


comments powered by Disqus