घरातून पळाली पण सामूहिक बलात्काराच्या चक्रात अडकली

Last Updated: Friday, May 9, 2014, 15:24

छोट्या गोष्टीवरून घरात झालेल्या भांडणाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आपलं घर सोडलं... पण, पुढे तिच्यावर जो प्रसंग ओढावला त्यानं ही मुलगी पुरती हादरून गेलीय.

प्रियकराने बनविला MMS, मित्राने केला रेप

Last Updated: Friday, March 28, 2014, 18:15

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथील शास्त्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका तरुणीला ब्लॅकमेल करून तिचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना जोधपूरमध्ये पकडलं

Last Updated: Monday, March 24, 2014, 09:35

दिल्ली एटीएस आणि जयपूर पोलिसांच्या पथकानं दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला असून इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना अटक केलीय. मुंबईच्या झवेरी बाजार आणि हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हात असलेल्यांसह इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना जोधपूर इथं पकडण्यात आलं.

हजारोंच्या उपस्थिती वसुंधरा राजे यांचा शपथविधी

Last Updated: Friday, December 13, 2013, 14:59

काँग्रेसचा धुव्वा उडवत राजस्थानमध्ये एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांनी जयपूर येथे शाही कार्यक्रमात मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी समारोह विधानसभा परिसरात झाला. यावेळी जवळपास ३० हजारांपेक्षा जास्तीचा समुदाय उपस्थित होता.

`स्पॉट फिक्सिंग`चा आरोपी श्रीसंत उद्या बोहल्यावर चढणार

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 20:35

भारतीय क्रिकेट टीमचा माजी सुपरफास्ट बॉलर आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये झालेल्या अटकेनंतर बाहेर पडलेला एस. श्रीसंत लवकरच बोहल्यावर चढतोय.

कोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 22:16

जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.

टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज...

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 16:13

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वन-डे मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर सीरिजमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे

मोदींचं नव्या ‘ABCD’द्वारं काँग्रेसवर टीकास्त्र...

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 15:32

राजस्थानची राजधानी जयपूर इथं आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि केंद्रसरकावर टीकास्त्र सोडलं. राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराचं मोदींनी रणशिंग फुंकलं. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार याची नवीन एबीसीडीच मोदींनी मांडली.

वडिलांनीच केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Last Updated: Thursday, August 22, 2013, 21:02

जयपूरमधील नहरगड भागात वडिलांनीच आपल्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

वायुसेनेच्या 'मिग-२१'ला अपघात, पायलट ठार

Last Updated: Monday, July 15, 2013, 14:39

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात प्रशिक्षण दरम्यान सोमवारी एक विमान खाली उतरताना पायलटचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने त्याला अपघात झाला.

`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 20:02

सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आता बॅकफूटवर आलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असं चुकून म्हटलं असेल, अशी सारवासारव काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे.

शिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं!

Last Updated: Sunday, January 20, 2013, 16:33

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विधानावर चक्क कोलांटउडी मारली आहे. एआयसीसी बैठकीतल्या भाषणात बोलताना त्यांनी `हिंदू` हा शब्द स्पष्टपणे वापरला होता. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना आपण `सॅफ्रॉन` म्हणालो, ‘हिंदू’ म्हणालोच नाही असं सांगत घूमजाव केलं.

भाजपचे कॅम्प हिंदू दहशतवाद्यांसाठी - सुशीलकुमार शिंदे

Last Updated: Sunday, January 20, 2013, 15:14

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केले. दरम्यान, काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा हल्ला भाजपने चढविला आहे.

देशात पुन्हा काँग्रेस सत्तेत - सोनिया गांधी

Last Updated: Sunday, January 20, 2013, 13:15

आगामी लोकसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाणार आहे. या निवडणुकीचा मुख्य मुद्दा विकास असेल. त्यामुळे २०१४ मध्ये देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार असेल, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे व्यक्त केला.

ही आत्मचिंतनाची वेळ - सोनिया गांधी

Last Updated: Friday, January 18, 2013, 16:06

जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेससाठी ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.

दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत गँगरेप

Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:24

दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश हादरलेला असतानाच राजधानीत आणखी एका ४२ वर्षीय महिलेवर तिघा नराधमांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जयपूर जलमय... चार जणांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:14

गुलाबी नगरी म्हणून ओळखली जाणारी राजस्थान राजधानी जयपूर सध्या पाण्यात बुडालीय. जयपूरमध्ये पावसानं एकच हाहाकार उडवून दिलाय. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय.

बॉलिवूड स्टारना अजमेर दर्ग्यात नो एंट्री

Last Updated: Monday, July 23, 2012, 13:35

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार तसेच बॉलिवूड स्टार आणि आपल्या मनातील ईच्छापूर्तीसाठी अनेक भाविक जयपूरमधील अजमेर दर्ग्याला भेट देत असतात. मात्र, यापुढे बॉलिवूड स्टारमंडळीना अजमेर दर्ग्याची दारे बंद करण्यात आली आहे.

शाहरूखची उतरली गुर्मी, मागितली माफी

Last Updated: Saturday, May 26, 2012, 17:57

कोलकता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आज शनिवारी माफी मागितली. तो एवढ्यावर न थांबता दंड भरण्याची तयारी दर्शविली आहे. सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल राजस्थान पोलिसांनी शाहरुखविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

शाहरुखला जयपूर कोर्टाची नोटीस

Last Updated: Friday, April 27, 2012, 11:21

जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएल पाचच्या सिझनमधील सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शाहरुखला जयपूर कोर्टाने नोटीस बजावली आहे. त्यानुसार शाहरूखला २६ मे रोजी उपस्थित राहावे लागणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान अडचणीत

Last Updated: Thursday, April 12, 2012, 13:04

आयपीएल पाचचा सिझन रंगात आला असताना नवा वाद कोलकाता टीमचा मालक आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याच्यामुळे निर्माण झाला आहे. जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. मात्र, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी आज १२ एप्रिलला होणार आहे.

जयपूर महापालिकेत कचऱ्यावरून हाणामारी

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 09:17

जयपूर महापालिकेत कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलाच हंगामा झाला. सुरूवातीला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर मात्र या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकशाहीला लाज आणेल असा प्रकार जयपूर महापालिकेच्या सभागृहात घडला.

मुंबईतील डॉनकडून मला धोका - सलमान रश्‍दी

Last Updated: Saturday, January 21, 2012, 08:51

वादग्रस्त लेखक सलमान रश्‍दी यांनी आपली भारतभेट रद्द केली आहे. माझी हत्या करण्यासाठी मुंबईतील माफिया डॉनने दोन भाडोत्री गुंडांना शस्त्रे पुरवली असल्याचे मला सांगण्यात आले आहे, असे ट्‌विट केले आहे.

क्रेझ 'रॉकस्टार' रणबीरची !

Last Updated: Thursday, October 20, 2011, 14:34

रॉकस्टारचं प्रमोशन करण्यासाठी रणबीर नुकताच पोहोचला जयपूरला.आणि त्याची एक झलक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने त्याच्या फॅन्सनी हजेरी लावली. रणबीरने स्टेजवर पाऊल टाकताच एकच जल्लोष झाला. त्याची एक झलक बघण्यासाठी हजारो फॅन्स इथे हजर होते