Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:42
झी २४ तास वेब टीम, मुंबई बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर ही जगातील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. इस्टर्न आय या साप्ताहिकाने ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून करिनाने मागच्या वर्षीची विजेती कतरिना कैफला पिछाडीवर टाकत सर्वोच्च स्थान पटकावलं.
बॉडीगार्ड आणि रा-वन सारखे हिट देणाऱ्या करिनाने अटीतटीच्या लढतीत अवघ्या एक टक्का जादा मत मिळवत हा किताब पटकावला. जगातील सर्वात सेक्सी आशियाई महिलांच्या स्पर्धेत एकापेक्षा एक मदनिका असताना करिनाने बाजी मारली.
कतरिना कैफ गेली तीन वर्षे सातत्याने हा किताब जिंकत होती ती यावेळेस दुसऱ्या क्रमांकावर घसरली. इस्टर्न आय शोबीझचे संपादक असजाद नझीर यांच्या मते दोन सौंदर्यवतींमधले हे युध्द बॉलिवूडमध्ये पुढच्या काही वर्षातल्या घडामोडींची चुणूक दाखवतात. या यादीत पॉप स्टार्स, टीव्हीवरील व्यक्तीमत्व, मॉडेल्स आणि फिल्म स्टार्स असताना खरी लढत मात्र करिना आणि कतरिना यांच्यात झाली आणि बाकीचे लोकप्रियतेच्या निकषावर खूपच मागे राहिले.
हृतिक रोशनची बायको सुझानलाही मोठ्या प्रमाणावर वाचकांनी कौल दिला आणि तिने १६ वा क्रमांक पटकावला. यादीतील प्रियांका चोप्रा आणि बिपाशा बसु दोघीही एक एक स्थान खाली घसरत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिल्या. फ्रिडा पिंटोने पाचवं तर दीपीका पदुकोणने सात स्थान पटकावलं.
जॅकलीन फर्नाडेंझ, नरगिस फखरी आणि सोनाक्षी सिन्ही यांचा पहिल्यांदाच या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. ऐश्वर्या राय बच्चन सहाव्या स्थानावर तर सोनम कपूर नवव्या लारा दत्ता १५ व्या आणि मलाइका अरोरा-खान १९ व्या स्थानावर राहिल्या.
First Published: Saturday, November 26, 2011, 08:42