Last Updated: Friday, November 25, 2011, 13:53
झी २४ तास वेब टीम, चेन्नई 'कोलावेरी डी' या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे आणि अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. यू ट्युबवर कोलावेरी डीला एका दिवसात दहा लाखाहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत आणि आता पर्यंत ४०,५२,१८९ हिट्सची नोंद झाली आहे. या गाण्याचा प्रोमो यू टयुबवर १६ नोव्हेंबरला रिलीज करण्यात आला आणि त्यानंतर संसर्गाप्रमाणे त्याची लोकप्रियता वाढतच गेली.
'कोलावेरी डी' या गाण्याला गुरूवार संध्याकाळ पर्यंत ३,०२०, १४ हिट्स प्राप्त झाल्या तर शुक्रवारपर्यंत त्यात वाढ होऊन ४,०५२,१८९ पर्यंत हिटस प्राप्त झाल्या. कोलावेरी डीच्या ठेका धरायला लावणाऱ्या संगीतावर दस्तुरखुद्द बिग बी ही फिदा झालेत. कोलावेरी डी हे गाणं तमिळ स्टार धनूषने त्याच्या 3 या सिनेमासाठी गायलं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन धनूषची पत्नी ऐश्वर्याने केलं आहे. 'कोलावेरी डी' हे गाणे अवघ्या अठरा वर्षाच्या अनिरुध्द रविचंदरने संगीतबध्द केलं आहे. बिग बी या गाण्याने एवढा प्रभावित झाला की त्याने या गाण्याच्या तारिफ करणाऱ्या काही ओळी ट्विटरवरही पोस्ट केल्या आहेत.
First Published: Friday, November 25, 2011, 13:53