'दोस्ताना-२' येतोय - Marathi News 24taas.com

'दोस्ताना-२' येतोय

www.24taas.com, मुंबई
 
अभिषेक बच्चनची पत्नी  ऐश्वर्या रायसोबतची जोडी जेवढी हिट झाली नव्हती, तेवढी दोस्तानामधली जॉन अब्रहमबरोबरची जोडी लोकप्रिय झाली होती.  २००८ मध्ये आलेल्या दोस्ताना मध्ये वेगळ्या प्रकारची सेक्स कॉमेडी पाहायला मिळाली होती.  प्रियंका चोप्रासारखी हॉट गर्ल असूनही भाव खाऊन गेली ती जॉन-अभिषेकचीच जोडी. परदेशात मुलीच्या  राहाण्याची सोय होण्यासाठी २ तरुण आपण समलिंगी जोडीदार असल्याची बतावणी करतात.आणि त्यानंतर जी धमाल उडते, ती प्रेक्षकांनी खूप एंजॉय केली.
 
आता लवकरच 'दोस्ताना'चा दुसरा भाग येतोय. जॉन अब्रहम आणि अभिषेक बच्चनच यात असतील. या सिनेमाचं दिग्दर्शन  दोस्तानाचे दिग्दर्शक  तरुण मनसुखानीच करणार आहेत. निर्माता करण जोहरने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. येणारा दुसरा भाग हा पहिल्या दोस्तानापेक्षा जास्त धमाल , नॉटी आणि सेक्सशी संबंधित जोक्सनी खच्चून भरलेला असेल. मात्र या सिनेमातून समलिंगी लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे असं करण म्हणाला.
 
या सिनेमाबद्दल जॉनला विचारलं असता तो म्हणाला, "मी पुन्हा अभिषेक बरोबर  धमाल करायला उत्सुक आहे, कधी एकदा दोस्तानाचं शुटिंग सुरू होतंय याचीच वाट बघतोय." हा सिनेमा लंडन आणि पंजाब अशा दोन ठिकाणी शूट करण्यात येणार आहे. या सिनेमात  प्रियंका चोप्रा या ही भागात असेल का, हे अजून नक्की सांगण्यात आलं नाहीये. मात्र, प्रियंकाच्या जागी यावेळी कतरिना कैफची वर्णी लागली असल्याची चर्चा आहे. एकुणच दोस्तानामधील वेगळ्या धाटणीच्या मैत्रीची धमाल  मस्ती पुन्हा पहायला मिळणार हे नक्की
 

First Published: Friday, April 27, 2012, 16:26


comments powered by Disqus