अभिषेक बच्चन आता भोजपुरी सिनेमात - Marathi News 24taas.com

अभिषेक बच्चन आता भोजपुरी सिनेमात

www.24taas.com, मुंबई 
 
अमिताभ बच्चन यांनी तीन तीन भोजपुरी सिनेमांमध्ये काम केल्यावर आता अभिषेकही भोजपुरी सिनेमांकडे वळला आहे.
 
३६ वर्षीय अभिनेता अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन यांचे मेक-अप मॅन दीपक सावंत यांच्या भोजपुरी सिनेमात भूमिका करणार आहे. दीपक सावंत यांना याबद्दल विचारला असता ते म्हणाले, “मला कधी तुमच्या भोजपुरी सिनेमात भूमिका का दिली नाही असं खुद्द अभिषेकनेच मला विचारलं. भोजपुरी सिनेमात काम करण्याचा प्रस्ताव मी त्याच्यापुढे ठेवण्याऐवजी त्यानेच माझ्यापुढे भोजपुरी सिनेमात काम करण्याची मागणी केली.”
 
आपल्या आगामी भोजपुरी सिनेमात अभिषेक बच्चन काम करणार असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं आहे. हा चित्रपट राजकारणावर आधारीत असेल. दोन राजनेत्यांच्या भांडणात तिसरा राजकारणी कसा स्वतःचा फायदा करून घेतो, असा या सिनेमाचा विषय आहे.
 
पहिले अमिताभ बच्चन यांनी गंगा, गंगोत्री और गंगा देवी यासारख्या भोजपुरी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा आयपीएलनंतर रीलीज होणार आहे असं दीपक सावंत सांगितलं आहे.
 

First Published: Thursday, May 3, 2012, 17:24


comments powered by Disqus