'सलमान-शाहरुख' एकत्र दिसणार? - Marathi News 24taas.com

'सलमान-शाहरुख' एकत्र दिसणार?

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडमधले दोन खान एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी फारच दुर्मिळ गोष्ट. पण, लवकरच ही संधी त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. हो, आपण बोलतोय सलमान आणि शाहरुखबद्दल. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही अशक्य गोष्ट शक्य होणार असं दिसतंय.
 
 
25 मे रोजी ‘ताज’मध्ये होणाऱ्या करणच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जवळजवळ सगळंच बॉलिवूड अवतरण्याची शक्यता आहे. ऋतिक रोशन, इमरान हाश्मी, कंगना रानावत, एकता कपूर, आदित्य चोपडा, अयान मुखर्जी, मनसुखानी असे विविध बॉलिवूड स्टार्सना अगोदरच निमंत्रण पाठवलं गेलं आहे.
 
करण जोहर हा जेवढ्या शाहरुखच्या जवळ आहे तेवढाच तो सलमानच्याही आहे. शाहरुख या पार्टीला असणारच आहे पण सलमानही करणला शुभेच्छा देण्यासाठी जरुर येईल असं दिसतंय. मग बघुया, करण जोहर या दोन खान मधला दुवा बनतोय का ?
 

First Published: Thursday, May 10, 2012, 21:25


comments powered by Disqus