Last Updated: Tuesday, November 29, 2011, 17:29
झी २४ तास वेब टीम, मुंबई पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने मिलन लुथ्रियाच्या द डर्टी पिक्चरच्या प्रदर्शनाला पाकिस्तानात बंदी घातली आहे. पाकिस्तानात सिनेमाकडे पाहण्याच्या प्रतिगामी दृष्टीकोनामुळे यात धक्का बसण्यासारखे काहीच नाही. बालाजी मोशन पिक्चर्सचे सीईओ तनुज गर्ग यांनी देखील बंदी घातल्याचं आपल्या ऐकण्यात आल्याचं सांगितलं.
आमिर खानच्या दिल्ली बेलीला त्यातल्या अश्लिलतेमुळे बंदी घालण्यात आली होती आणि आता द डर्टी पिक्चरवर ती पाळी ओढावली आहे. पाकिस्तानात प्रदर्शनास द डर्टी पिक्चर योग्य नसल्याचं तिथल्या सेन्सर बोर्डाचे मत आहे. पाकिस्तान हिंदी सिेनेमासाठी मोठं मार्केट आहे. पाकिस्तानात अनेकदा पायरेटेड डीव्हीडी सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशीच उपल्बध होतात.त्यामुळे जरी सिनेमागृहात द डर्टी पिक्चर प्रदर्शित होऊ शकला नाही तरी तो पाकिस्तानी सिने शौकिनांना पायरेटेड डिव्हीडीमुळे तो पाहता येईल.
First Published: Tuesday, November 29, 2011, 17:29