हिमेशच्या सिनेमात ला टोया जॅकसनची भूमिका - Marathi News 24taas.com

हिमेशच्या सिनेमात ला टोया जॅकसनची भूमिका

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
किंग ऑफ पॉप मायकल जॅकसनच्या आयुष्यावर आणि त्याच्या गुढ मृत्यूवर आधारीत हिमेश रेशमिय्या सिनेमा काढत असल्याची चर्चा आहे. हिमेशच्या पहिल्या आतंरराष्ट्रीय सिनेमाचा नाव A is Killed मध्ये मायकेल जॅकसनची मोठी बहिण ला टोया जॅकसन काम करणार आहे. या सिनेमात ला टोया जॅकसनने काम करावं यासाठी फ्रेंच दिग्दर्शक ख्रिस्तोफर लेनोएने संपर्क साधला होता. ख्रिस्तोफर लेनोएच्या एजंटनी ला टोयाशी संपर्क साधला.
 
हिमेशने या फिल्मच्या सिक्वेनसेसचे शुटिंग संपवलं आहे. ला टोयाच्या भूमिका असलेल्या भागाचे शुट पॅरिस किंवा अमेरिकेत केलं जाणार असल्याचं समजतं. हिमेश या सिनेमात सिध्दार्थ पटेल या भारतीय संगीतकाराची भूमिका साकारतो. सिध्दार्थ पटेल मायकेल जॅकसनच्या करिष्म्याने प्रभावित झालेला असतो. या सिनेमात सेलिब्रिटी ब्लॅगर पेरेझ हिटलर देखील काम करणार आहे.

First Published: Tuesday, November 29, 2011, 18:12


comments powered by Disqus