Last Updated: Wednesday, April 16, 2014, 19:13
www.24taas.com, झी मराठी61 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यात आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा `शिप ऑफ थीसियस`ला 2013 चा सर्वोत्कृष्ट सिनेमा घोषित करण्यात आला.
हंसल मेहता यांना हिंदी चित्रपट शाहिदसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.
शाहिद चित्रपटातील अभिनेता राजकुमार रावला सर्वश्रेष्ठ अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. राजकुमार राव आणि मल्याळम अभिनेता सूरज वेंजारामूदू यांना या पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा भाग मिल्खा भागला 2013 चा सर्वोत्कृष्ट मनोरंजक सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
जॉली एलएलबी या सिनेमातील सौरभ शुक्ला यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झालाय.
सामाजिक विषयांवर आधारीत असलेला आहिराणी चित्रपट `तुह्या धर्म कोंचा` या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ सिनेमाचा पुरस्कार देण्यात आलाय. तर सर्वश्रेष्ठ बाल सिनेमाचा पुरस्कार काफलला देण्यात आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 19:10