वीणा मलिकने १३७ वेळा किस देऊन रचला विश्व रेकॉर्ड, Veena Malik enters Guinness World Records with 137 kisses

वीणा मलिकने १३७ वेळा किस देऊन रचला विश्व रेकॉर्ड

वीणा मलिकने १३७ वेळा किस देऊन रचला विश्व रेकॉर्ड
www.24taas.com, मुंबई

पाकिस्तानची विवादास्पद हॉट अभिनेत्री वीणा मलिकने एका मिनीटात १३७ वेळा किस करून एक नवा विश्व रेकॉर्ड रचला आहे. वीणा मलिकने १३७ वेळ चुंबन देऊन बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचाही रेकॉर्ड मोडला आहे.

वीणाने २६ फेब्रुवारीला आपल्या वाढदिवशी सगळ्यात जास्त किस करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा निश्चय केला होता. आणि वीणा मलिकने हा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. या आधी हातावर सगळ्यात जास्त किस करण्याचा रेकॉर्ड हा सुपरस्टार सलमान खानच्या नावावर होता.

वीणा मलिकचा आगामी सिनेमा ‘दि सिटी दॅट नेव्हर स्लीप’च्या हिरो हंटसाठी एक प्रतियोगिता आयोजित केली होती. यातील ४१ लोकांनी वीणा मलिकच्या हातावर १३७ वेळ किस केलं. वीणा मलिकने मीडियाशी बातचीत करताना सांगितले की, अनेक अशा गोष्टी आहेत की, ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो. मी पहिली पाकिस्तानी महिला होती, जिने ट्विटरवर सगळ्यात जास्त ट्रेंड केलं होतं.

या रेकॉर्डबाबत वीणा मलिकने सांगितले की, मी तर सलमान खानच्या खूप पुढे निघून गेली आहे. मला १३७ वेळा किस केलं आहे. आमच्या सिनेमाने ठरवलं आहे की, आपण २० विश्व रेकॉर्ड तोडू त्यातीलच हा एक होता. वीणा मलिकने सांगितले की, तसं तर स्क्रीनवर कोणाला चुंबन देणं, फारच कठीण असतं. पण आजकाल सिनेमा हीट होण्यासाठी अशा साऱ्या गोष्टी करणं गरजेचं असतं.

First Published: Wednesday, February 27, 2013, 22:23


comments powered by Disqus