Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:18
www.24taas.com, वृत्तसंस्था, मक्कापाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आता सिनेमामध्ये काम करणार नाही. तसे तिनेच जाहीर केले आहे. मात्र, सामाजिक विषय आणि धार्मिक संदेश देणाऱ्या चित्रपटात काम करू, असे पाकिस्तानी बोल्ड अभिनेत्री वीना मलिक हिने स्पष्ट केले आहे.
वीणा मलिकने ही घोषणा मक्का येथील उमरानंतर केली. ज्यावेळी मनोरंज उद्योगमधील गोष्ट असेल तर मी केवळ सामाजिक विषयासंबंधित योजनांबाबत काम करीन. असे असले तरी बोल्ड सिनेमात यापुढे काम करणार नाही, असे तिने स्पष्ट केले.
वीणाने गत वर्षी असद बशीर खान या उद्योगपतीशी निकाह केला. अशद आणि त्याच्या कुटुंबीयांबरोबर उमरासाठी ती मक्का येथे गेली होती. वीणा मलिक सध्या एका टीव्ही शो कार्यक्रमात दिसली. मौलाना तारिक जमील यांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या जीवनात बदल झाला आहे, असे तिने सांगितले.
वीणाने कन्नड भाषेतील एका सिनेमात काम केले होते. ही सिनेमा खूपच चर्चेत होता. हा सिनेमा डर्टी पिक्चरवर आधारित होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 16:42