अभिनेत्री वीणा मलिकने केलं गुपचुप लग्न, Veena Malik to marry Assad Bashir

अभिनेत्री वीणा मलिकने केलं गुपचुप लग्न

अभिनेत्री वीणा मलिकने केलं गुपचुप लग्न
www.24taas.com, वृत्तसंस्था, दुबई

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने गुपचुप लग्न केलं. दुबईतील उद्योगपती असद बशीरसोबत तिने निकाह केला आहे. वीणा मलिक बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील प्रमुख स्पर्धक होती.

नेहमीच आपल्या वागण्या-बोलण्याने पाकिस्तानपासून भारतामध्ये वादात असणाऱ्या वीणाने गुपचुप लगीनगाठ बांधली. २९ वर्षीय या अभिनेत्रीने दुबईमधील एका कोर्टात निकाह केला. असद बशीरचा दुबई आणि अमेरिकेत व्यवसाय आहे. असद हा वीणा मलिकच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे.

विवाहानंतर वीणा म्हणाली, मी आज खूप खुश आहे. मी जगातील भाग्यवान मुलगी आहे, असं मला वाटतंय. आपल्या कुटुंबियांनी निवडलेल्या मुलाशी मी लग्न केलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 26, 2013, 11:40


comments powered by Disqus