वीणा मलिकने बॉयफ्रेंडला वागवले स्पॉट बॉयप्रमाणे?, Veena Malik treated her ex boyfriend as ATM, valet

वीणा मलिकने बॉयफ्रेंडला वागवले स्पॉट बॉयप्रमाणे?

वीणा मलिकने बॉयफ्रेंडला वागवले स्पॉट बॉयप्रमाणे?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिचा नुकताच दुबईतील बिझनेसमन असद बशीर खान यांच्याशी विवाह झाला. पण आता ती अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांत प्रताप सिंग याने अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.

एका प्रसिद्ध वर्तमानपत्रानुसार, प्रशांत मुंबईत एक डिजीटल कंपनीचा मालक आहे. वीणाने असद यांच्याशी लग्न केलं, ते साधं मला सांगितलंही नाही. प्रसारमाध्यमांकडून प्रशांतला वीणाच्या लग्नाचे कळाले. प्रसारमाध्यमांतून प्रशांतने वीणाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी वीणा घाबरली. तिला वाटले की तिच्या सिक्रेट संबंधाबाबत प्रशांत जगाला ओरडून सांगेल.

वीणाने त्या चिंतेत प्रशांतच्या आईला फोन केला आणि धमकावले की ती त्यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेल. त्यानंतर वीणाने प्रसार माध्यमांना सांगितले की, प्रशांत हा गे आहे, तो माझा कर्मचारी होता. त्यानंतर प्रशांतने त्याचे आणि वीणाचे काही खासगीतील फोटो प्रसारमाध्यमांना दाखविले आणि खरं काय आहे हे सांगितले.

वीणाने प्रशांतशी असलेल्या कोर्टशीपच्या कालावधीत प्रशांतचा ड्रायव्हर म्हणून वापर केला. तिला शहरात फिरविण्याची जबाबदारी ही प्रशांतची असायची. त्यामुळे तो आपल्या कारमधून तिला मुंबईत फिरवायचा. तसेच तिला शुटिंगच्यावेळी शूट घालण्यातही मदत करायचा. वीणाचे सर्व बिल तोच पेड करायचा.

वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रशांतने वीणाला त्याची आणि त्याच्या आईची माफी मागण्यास सांगितले आहे. तसेच तिने दीड कोटींची रक्कम घेतली तसेच आय पॅड आणि कॅमेरा घेतला तो परत करण्यास सांगितले आहे.

वीणा आणि प्रशांत गेल्या दीड वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 6, 2014, 18:33


comments powered by Disqus