विराट थेट गेला अनुष्काच्या घरी, घालवली रात्र..., Virat was directly Anushka`s house, about to lose N

विराट थेट गेला अनुष्काच्या घरी, घालवली रात्र...

विराट थेट गेला अनुष्काच्या घरी, घालवली रात्र...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली हा अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या आतापर्यंत पसरल्या गेल्या होत्या. पण बुधवारी मात्र विराट खरोखरच अनुष्काच्या प्रेमात पडल्याचे सिद्ध झाले.

दक्षिण आफ्रिकेहून भारतीय संघाचे बुधवारी मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यानंतर सर्व खेळाडू पुढील प्रवासामुळे विमाने पकडून आपापल्या घरी निघून गेले. पण विराट कोहली मात्र मागेच राहिला. थोडा वेळ त्याच ठिकाणी वाट पाहिल्यावर अनुष्का शर्माची करड्या रंगाची रेंज रोवरही गाडी तेथे आली. विराटने आपले सामान त्या गाडीत टाकले आणि गाडी निघून गेली. यानंतर काही क्षणानंतर पांढर्या रंगाची ऑडी तेथे गाडी आली. यामध्ये विराट बसून निघून गेला. त्या गाडीत बसून तो थेट अनुष्का शर्माच्या घरी गेला. सूत्रांच्या माहितीनुसार विराटने रात्रभर तिकडेच मुक्काम केला.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या जवळच्या व्यक्तीकडून सांगण्यात आले की, अनुष्का आणि विराट नेहमी भेटत असतात. त्या दोघांनाही बाहेर फिरणे पसंत नाही. पण त्यांना लांबचा प्रवास करायला आवडतो. जेव्हा विराट मुंबईत येतो तेव्हा मोकळ्या वेळी तो अनुष्काबरोबर असतो. दूरदर्शनच्या एका शॉम्पूच्या जाहिरातीमुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकत्र आले होते. त्यानंतर त्यांना वर्सोवा येथील निवासस्थानी दोघांना एकत्र पाहिले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 3, 2014, 19:25


comments powered by Disqus