व्हिडिओ: अभिनेत्री अलिया भट्ट झाली गायिकाWatch: Alia Bhatt croons to `Sooha Saha` from `Highway`

व्हिडिओ: अभिनेत्री अलिया भट्ट झाली गायिका

<B> <font color=red>व्हिडिओ: </font></b>अभिनेत्री अलिया भट्ट झाली गायिका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री अलिया भट्टचा मधूर आवाज सध्या गाजतोय. तिच्या गाण्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाल्यापासून तिचे फॅन्स आणखीनच खूश झाले आहेत.

दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी ‘हायवे’ चित्रपटात एक गीत अलियानं गायलंय. विशेष म्हणजे चित्रपटाला ए.आर.रेहमानचं आहे. हायवे हा एक प्रवासावरील आधारीत सिनेमा आहे. यात अभिनेता रणदीप हूडा अलिया भट्टसोबत दिसेल.

आपल्या गाण्याबद्दल अलिया म्हणते, मी एक बाथरूम सिंगर होती. पण चित्रपटाच्या शूट दरम्यान झालेल्या प्रवासात मी सारखं ए.आर.रेहमान यांचं ‘जिया रे जिया’ हे गाणं गुणगुणायची. इम्तियाज अली यांनी अलियातलं हेच टॅलेन्ट ओळखून तिला गाण्याची संधी दिलीय.

संगीतकार ए. आर. रेहमान अलियाच्या गाण्यावर म्हणतात जर तिनं गाण्याचा योग्य रियाज केला. तर ती उत्तम गायिका बनू शकते. तर अलिया म्हणते मी जर चांगली अभिनेत्री झाली नाही तर गायिका होण्याचा प्रयत्न नक्की करेल.
यूटीव्ही मोशनचा ‘हायवे’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होतोय.


पाहा व्हिडिओ




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 20, 2014, 08:43


comments powered by Disqus