Last Updated: Thursday, May 8, 2014, 11:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज कपूर यांचा नातू अरमाननं रणबीर कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय.
अरमान हा राज कपूर यांची मुलगी रीमा जैन यांचा मुलगा आहे. अभिनेता सैफ अली खानच्या रोम-कॉमद्वारे ‘लेकर हम दीवाना दिल’ नावाच्या चित्रपटातून अरमान बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतोय. चित्रपटाचा पहिला ट्रेलर लॉन्च झालाय.
चित्रपटात ‘दीक्षा सिंग’ ही अभिनेत्री अरमानच्या अपोझिट काम करतेय. तिचाही हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अरीफ अली यांनी केलंय. तर निर्माता आहे दिनेश विजन, सैफ अलि खान आणि सह निर्माता सुनिल लुल्ला. ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमानचं संगीत या चित्रपटाला आहे.
‘लेकर हम दीवाना दिल’ ही कथा आहे दोन मित्रांची, जे एकमेकांसोबत लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला कसे सामोरं जातात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय.
पाहा ट्रेलर *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 8, 2014, 11:43