Last Updated: Thursday, June 13, 2013, 17:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शाहरुख खान आणि दीपिका पदूकोन यांचा बहुचर्चित सिनेमा चेन्नई एक्सप्रेस लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय. यूटीव्ही मुव्हीजच्या माध्यमातून हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
हा ‘अॅक्शन कॉमेडी’ चित्रपट रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलाय. २००७ साली ब्लॉकब्लस्टर ठरलेल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका आणि शाहरुखची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात दीपिका एका टीपिकल ‘दक्षिण भारतीय’ मुलीच्या रुपात तर शाहरुख एका चाळीशीच्या दरम्यान असलेल्या एका पुरुषाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदा दीपिकाला भेटलेला शाहरुख नंतर तिच्या वडिलांना भेटतो आणि चित्रपटातील घडामोडींना आणखी गंमत येते... अहो, ही गंमत वाचताय काय... पाहायला जास्त गंमत येईल ना! मग पाहा...
पाहा... याच सिनेमाचा फर्स्ट ट्रेलर
First Published: Thursday, June 13, 2013, 17:22