पाहा : बहुचर्चित `सत्याग्रह`ची ही पहिली झलक!, WATCH: Trailer of Prakash Jha’s multi-starrer `Satyagraha`

पाहा : बहुचर्चित `सत्याग्रह`ची ही पहिली झलक!

पाहा : बहुचर्चित `सत्याग्रह`ची ही पहिली झलक!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रकाश झा यांचा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेला बहुचर्चित ‘सत्याग्रह’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. झा यांच्या चित्रपटाचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांच्या अनेक चित्रपटांत एक सामाजिक संदेश किंवा गहिरा अर्थ प्रेक्षकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न... हाच प्रयत्न आपल्याला याअगोदर गंगाजल, अपहरण, मृत्यूदंड आणि राजनीती या चित्रपटांमध्येही दिसला होता.

या संदेश स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहचवण्याचं कसब झा यांनी चांगलंच जमवलंय. त्यांच्या आगामी ‘सत्याग्रह’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगण, मनोज वाजपेयी, करीना कपूर, अर्जुन रामपाल आणि अमृता राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मानव राघवेंद्र (अजय देवगण), त्याचे वडील (अमिताभ बच्चन), एका राजनेता (मनोज वाजपेयी), महत्त्वकांक्षी आणि जमावाच्या भावना चेतावणारा नेता (अर्जुन रामपाल) आणि आपल्या जीवनात लढा देणारी – प्रेमात पडलेली एक तरुण मुलगी यांच्या व्यक्तीरेखा ट्रेलरमधूनही स्पष्ट दिसून येतात... चला, पाहुयात याच सिनेमाचा ट्रेलर

सत्याग्रहचा ट्रेलर इथे पाहा...



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 27, 2013, 15:07


comments powered by Disqus