Last Updated: Sunday, January 12, 2014, 20:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘हसी तो फसी’ या चित्रपटातील ‘जेहनसीब...’ हे एक रोमान्टिक गाणं अनेक तरुणांच्या हृदयाची धडधड बनलंय. अतिशय सुंदर शब्द आणि त्याचं चित्रिकरणाची नाळ जुळवताना सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीतीनं जान लावलीय.
`धर्मा प्रोडक्शन’च्या या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत... ही जोडी यानिमित्तानं पहिल्यांदाच एकत्र येतेय. विनिल मॅथ्यू यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हास्याचा धमाका असलेल्या या चित्रपटात परिणीती ‘टॉमबॉय’ बनलीय तर सिद्धार्थ एका गोंधळलेल्या तरुणाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून तरी सिद्धार्थ आणि परिणीतीची केमिस्ट्री चांगलीच जुळलीय असं दिसतंय. सिद्धार्थ जोहर यापूर्वी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटात दिसला होता.
‘जेहनसीब जेहनसीब
तुझे चाहूँ बेतहाशा जेहनसीब
मेरे करीब, मेरी हबी
तुझे चाहूँ बेतहाशा जेहनसीब’ हे गाण्यातले शब्द अनेकांच्या मनात बऱ्याच वेळ घोंगावत राहतात. हे गाणं विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलंय. तर चिन्मयी श्रीपदा आणि शेखर रावजीअनी यांनी गायलंय तर हे गाणं लिहिलंय अमिताभ भट्टाचार्य यांनी...
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 12, 2014, 20:26