असे खेळतात बॉलिवूड स्टार होळी! What are you doing this Holi? A Bollywood survey

असे खेळतात बॉलिवूड स्टार होळी!

असे खेळतात बॉलिवूड स्टार होळी!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

धुळवडीत बॉलिवूडमधील अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेता राजकुमार राव यांसारखे दिग्गज कलाकर रंग उधळणार आहेत. मात्र अभिनेत्री परिणिती चोप्रा, आलिया भट्ट आणि नरगिस फाकरी यांसारखे बॉलिवूडमध्ये नुकतेच पदार्पण केलेले कलाकार धुळवडीत रंगणार नाहीयेत. त्यांच्या कामात ते व्यस्त असल्यामुळे त्यांना होळीची मजा घेता येणार नाहीय.

बघूया काय सांगतायेत कलाकार होळीविषयी

> फरहान अख्तर: मी तर होळीचे क्षण हे माझ्या कुटुंबियांबरोबर घालवून साजरी करतो.

> परिणिती चोपडा : सध्या माझं शूटिंग दिल्लीमध्ये चालू असल्यामुळे माझ्यासाठी होळीचा दिवस हा कामात जाणार आहे.

> आयुष्मान खुराणा : होळीचा मला जास्त काही उत्साह नसतो. त्यामुळे मी होळी कुटुंबियांना वेळ देवून साजरी करणार आहे.

> आलिया भट्ट : `हम्टी शर्मा की दुल्हनिया` या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला होळी साजरी करता नाही येणार.

> राजकुमार राव : माझी होळी मित्र मंडळी आणि कुटुंबियांबरोबर साजरी होते.

> शबाना आझमी : माझ्या वडिलांच्या घरी होळीची एक परंपरा असल्याने, आमच्या चित्रपटातील मित्र मंडळीसह होळी साजरी होईल.

> ऋषी कपूर: माझी चंडीगढमध्ये शूटिंग चालू आहे. मी दोन दिवसाची सुट्टी घेतली आहे मात्र मी होळी साजरी करत नाही.

> नरगिस फाकरी: `मैं तेरा हिरो` चित्रपटाचं प्रमोशन सुरू असल्यानं, मला होळी साजरी करता येणार नाही.

> मनोज वाजपेयी: मी कधीच होळी खेळत नाही. मात्र मुलीसाठी माझ्याकडे पर्याय नाही.

> रोनित रॉय : मी तर कित्येक वर्ष होळी खेळलो नाहीय.

> मनीष पॉल : मित्रांच्या फार्महाऊसवर माझे मित्रमंडळी आणि कुटुंबियांबरोबर मी होळी खेळणार.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Monday, March 17, 2014, 11:54


comments powered by Disqus