Last Updated: Friday, March 7, 2014, 19:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवूडचा सुपरहिरो क्रिश म्हणजेच ऋतिक रोशन आणि सुझान खान यांना वेगळं होऊन आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटलाय. या दरम्यान सुझाननं आपल्या हातावर एक टॅटू गोंदवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. सुझानला तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वांद्रे परिसरात बघण्यात आलं. तेव्हा तिच्या हातावर `फॉलो यू` हा टॅटू गोंदलेला दिसला. फॉलो यू म्हणजे पाठलाग....
आपल्या टॅटूचा अर्थ आणि कारण अजून सुझाननं स्पष्ट केलेला नाहीय. मात्र याचा अर्थ असा तर नव्हे की सुझान तिचा नवरा ऋतिक रोशनला फॉलो करतेय. याचं उत्तर तर आता सुझानच देऊ शकेल.
सुझान आणि ऋतिकनं आपल्या लग्नाच्या १३व्या वाढदिवसाच्या ( २० डिसेंबर २०१३) अवघ्या ७ दिवसांपूर्वी (१३ डिसेंबर) आपल्या काडीमो़डचं जाहीर केलं. दोघांमधील नातं पुन्हा पूर्ववत होण्यासाठी संजय खान आणि राकेश रोशन यांनी सुझानची भेटही घेतली असल्याचं कळतंय. सुझान सध्या वर्सोवाजवळील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहतेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 7, 2014, 19:41