अन् नाना पाटेकर संतापला....When Nana Patekar Threatened To Walk Out Of ‘Welcome Back’

अन् नाना पाटेकर संतापला....

अन् नाना पाटेकर संतापला....

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे तापट डोक्याचे आहेत हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला ठाऊक आहे. नाना पाटेकर यांना काही पटले नाही तर ते बेधडक बोलण्यात मागे पुढे पाहत नाही. याचा फटका निर्माता फिरोज नाडियादवालाला त्याचा अनुभव आला.

‘वेलकम’ या चित्रपटाचा सिक्वल सध्या फिरोज नडियादवाला बनवत आहेत. ‘वेलकम बॅक’ या चित्रपटाचे दुबईत शुटिंग सुरू आहे. त्यावेळी नाना आणि फिरोजचा वाद झाला आणि प्रकरण हातघाईवर आले. अखेरच्या क्षणी फिरोजने चित्रीकरण रद्द केल्याने नानाची तारपीट सटकली होती.

श्रुती हसन आणि अनिल कपूर यांनी मांडवली करून हे प्रकरण मिटवले. त्यानंतर फिरोज आणि नाना यांनी हात मिळवणी केली. नंतर प्रकरण निवळले.

वेलकम बॅकमध्ये जॉन इब्राहिम आणि श्रुती हसन प्रमुख भूमिकेत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 30, 2013, 18:34


comments powered by Disqus