Last Updated: Wednesday, March 13, 2013, 16:12
www.24taas.com, मुंबईशाहरुख खान आणि सलमान खानमधील दुश्मनी आता त्यांच्याइतकीच प्रसिद्ध आहे. दोघेही अभिनेते एकमेकांचं तोंड पाहात नाहीत. एकमेकांबद्दल बोलणंही टाळतात. आणि बोलले तर एकमेकांना टोमणेच जास्त मारतात. मात्र आता शाहरुख सलमान एकत्र दिसणार आहेत.. ते ही जपानमध्ये...
शाहरुख खान आणि सलमान खान या दोन्ही सुपरस्टार्सनी बॉलिवूडमध्ये २० वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. गेल्या २० वर्षांत दोघांनी एकाहून एक जबरदस्त हिट सिनेमे देऊन स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं आहे. शाहरुख खानचे आणि सलमान खानचे फॅन्स दोघांपैकी सर्वांत मोठा सुपरस्टार कोण, यावर वाद घालत असतात. पण दोघेही आपापल्या ठिकाणी सुपरस्टार्स आहे.
सुरूवातीच्या काळात शाहरुख सलमान दोघेही चांगले मित्र होते. ‘करण-अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम तुम्हारे है सनम’ या सिनेमांमध्ये एकत्र दिसले होते. तर शाहरुखच्या आग्रहाखातर ‘ओम शांती ओम’मध्ये आणि शाहरुख सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्येही सलमान खान सहभागी झाला होता. मात्र एका पार्टीत दोघांमध्ये भांडण झालं. मारामारीची वेळ येण्याइतपत हे भांडण विकोपाला गेलं. त्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. अनेकांनी प्रयत्न करूनही ते एकत्र आले नाहीत.
पण जपानमध्ये यंदा एप्रिलमध्ये शाहरुख आणि सलमान समोरा समोर उभे ठाकणार आहेत. कारण २० एप्रिल रोजी जपानच्या थिएटर्समध्ये सलमान खानचा ‘एक था टायगर’ आणि शाहरुख खानचे ‘जब तक है जान’ आणि ‘डॉन २’ हे सिनेमे झळकणार आहेत. त्यामुळे जपानच्या लोकांना शाहरुख आणि सलमान दोघेही पाहायला मिळणार आहेत.
First Published: Wednesday, March 13, 2013, 16:12