फिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात

Last Updated: Friday, June 20, 2014, 07:59

उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.

कर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी

Last Updated: Friday, May 9, 2014, 13:10

वाराणसीमधील रोहनियाच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचे वाकून पाय धरले. ती व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक राहिली आहे. कर्नल निजामुद्दीन असं त्यांचं नाव असून, ते वय 115 वर्षांचे आहेत. मोदींनी कर्नल निजामुद्दीन यांचा व्यासपिठावर सन्मान केला. तसेच व्यासपिठावर कर्नल निजामुद्दीन समोर वाकून त्यांचा आशिर्वादपण घेतला.

बेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज

Last Updated: Friday, March 28, 2014, 15:41

बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.

निसानची तीन लाखांची ‘डटसन गो’

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 14:00

जपानच्या निसान अॅटोमोबाईल कंपनीची ‘डटसन गो’ ही छोटी हायटेक कार बुधवारी विक्रीसाठी हिंदुस्थानी बाजारात लॉन्च होणार आहे. तीन लाख रुपये किमतीची ती कार एक लिटर पेट्रोलमध्ये २० कि.मी. अंतराचे मायलेज देणार आहे.

जपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!

Last Updated: Friday, March 14, 2014, 09:03

कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.

अमेरिकेला धुडकावून रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 11:00

युक्रेनमधील अस्थिरता लक्षात घेऊन रशियाने आपले सैन्य घुसवले. जगातून रशियाच्या या निर्णयाला विरोध होत आहे. अमेरिकेने विरोध करताना चिंता व्यक्त केलेय. आपले सैन्य युक्रेनमध्येच राहिल, असे स्पष्ट संकेत रशियाने दिलेत. दरम्यान, युक्रेन समस्येचा परिणाम रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर झालाय. रशियाचा शेअरबाजार कोसळला आहे.

धूलीकण आणि गॅसमुळे निर्माण होतोय `चमकणारा ग्रह`!

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 10:53

जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

‘कावासाकी’ सुस्साट... ‘१००० सीसी’च्या दोन बाईक लॉन्च!

Last Updated: Thursday, December 26, 2013, 20:40

जपानची टू-व्हिलर कंपनी ‘कावासाकी’नं भारतात दोन नव्याकोऱ्या बाईक ‘झेड-१०००’ आणि ‘निंजा-१०००’ लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाइकची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत १२ लाख १२ हजार रुपये इतकी आहे. कंपनीनं ‘निंजा झेड एक्स-१४ आर’ आणि ‘झेड एक्स-१० आर’सहीत प्रीमियम मोटारसायकलच्या चार मॉडेलचा समावेश करुन भारतात दरवर्षी आर सिरीजच्या २५० बाइक्स विकण्याचा निर्धार केलाय.

२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला!

Last Updated: Sunday, September 8, 2013, 12:14

२०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचं आयोजन करण्याचा मान जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराला मिळालाय. शनिवारी रात्री अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स इथं ऑलिंपिक समिती म्हणजेत आयओसीतर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला.

किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने धोक्याचा इशारा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 16:24

जपानमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमा आण्विक प्रकल्पामधील किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने जपानमधील आण्विक नियामक संस्थेने दक्षतेचा इशारा दिला आहे.

‘इंग्रजी येत नसल्यामुळे जपानला फायदा’

Last Updated: Saturday, June 29, 2013, 12:09

वित्तीय संकटामुळे जिथे इतर देशांना आर्थिक फटका बसला तिथे जपानी बँका मात्र होणाऱ्या नुकसानीपासून वाचल्यात आणि या गोष्टीचे सारे श्रेय इंग्रजी भाषेला जाते, असे जपानचे अर्थमंत्री तारो असो यांनी म्हटलयं.

ताशी ५०० किमी वेगानं धोवतेय ट्रेन

Last Updated: Thursday, June 6, 2013, 11:04

जपानमध्ये ताशी तब्बल ५०० किलोमीटर वेगानं जाणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आलीये. मॅग्नेटिक लेव्हिटेटिंग म्हणजे चुंबकीय बलाचं तंत्रज्ञान या गाडीसाठी वापरण्यात आलंय.

शाहरुख-सलमान जपानमध्ये आमने-सामने!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 16:12

शाहरुख खान आणि सलमान खानमधील दुश्मनी आता त्यांच्याइतकीच प्रसिद्ध आहे. दोघेही अभिनेते एकमेकांचं तोंड पाहात नाहीत. एकमेकांबद्दल बोलणंही टाळतात. आणि बोलले तर एकमेकांना टोमणेच जास्त मारतात. मात्र आता शाहरुख सलमान एकत्र दिसणार आहेत.. ते ही जपानमध्ये...

`फायर आइस`चा शोध... जपानला संजीवनी!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 10:23

जपानच्या वैज्ञानिकांनी समुद्रतळाच्या तळाशी जाऊन ‘मिथेन हायड्रेट’ नावाचा गॅस शोधून काढलाय. याचा फायदा येणाऱ्या शंभर वर्षांपर्यंत इंधन म्हणून केला जाऊ शकतो, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केलाय.

अरेरे.. जपानमध्ये असंही वाढलं जातं हॉटेलमध्ये जेवण

Last Updated: Friday, December 7, 2012, 18:07

हॉटेलमध्ये जर का एखाद्या सुंदर मुलीने जेवण सर्व्ह केलं तर.. त्याची मजा काही औरच असते. मात्र जपानमध्ये एका हॉटेलात अगदीच विचित्र पद्धतीने जेवण सर्व्ह केलं जातं.

पुन्हा जपान हादरला

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 18:50

उत्तर जपानला आज मंगळवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे अनेकांची पळापळ झाली. पूर्वीच्या भूकंपाच्या काही आठवणी ताज्या झाल्यात. जाणवलेल्या भूकंपाचा धक्का रिश्टर स्केलवर ६.४ इतका नोंदवला गेला.

जपानची त्सूनामीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली

Last Updated: Sunday, March 11, 2012, 11:08

जपानमध्ये विध्वंस घटवणाऱ्या भूकंप आणि त्सूनामीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. जपानने एक मिनिटाची शांतता पाळत विनाशकारी भूकंप आणि त्सूनामीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली.

टोकियोमध्ये १ वर्षाचं पेंग्विन हरवलं

Last Updated: Saturday, March 10, 2012, 16:20

जपानमधल्या टोकियो सी लाईफ पार्कमधून निसटलेल्या एका पेंग्विनचा सध्या कसून शोध घेतला जात आहे. एक वर्ष वयाचा हा हम्बोल्ट पेंग्विन कुठल्या मार्गानं निसटला असावा यावर सध्या बरीच खलबतं चालली आहेत.

जपानमध्ये 'ड्रॅगन वर्षा'ची धूम

Last Updated: Saturday, February 4, 2012, 22:10

जपानच्या योकोहामामध्ये लुनार नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो चायनीज बांधव एकत्र आले होते, यावेळी एक मोठा परेड मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी जवळपास २०० परफॉर्मर्स पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

जपानमध्ये पुन्हा भूकंप

Last Updated: Sunday, January 1, 2012, 12:37

वर्षाचा पहिला दिवस जगभराने आनंदाने साजरा केला आसला तरी, जपानमध्ये मात्र पुन्हा भुकंपाने नववर्षाचं आगमन झालं आहे. टोकयो आणि आसपासच्या परिसरात आज भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल एवढी होती.

जगभरात ख्रिसमसचा उत्साह

Last Updated: Saturday, December 24, 2011, 23:57

जगभरात आता ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लंडनमध्येही ब्रिटिश प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमरून यांनी ट्राफलगर स्क्वेअरवर ख्रिसमस ट्री प्रज्वलित करून सिझनची खऱ्या अर्थानं सुरुवात केली.

जपानी संस्कृतीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती!

Last Updated: Thursday, December 15, 2011, 10:10

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूनिर्मितीमधील प्रसिद्ध कंपनी पॅनासॉनिकने जपानी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. जपानी भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या, विज्ञान-तंत्रज्ञान विषय घेऊन पदवीधारकांना ही शिष्यवृत्ती मिळविता येईल.

जपानी तरुणाई एकटेपणाने घेरलेली

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 06:24

जपानी तरुणाई विलक्षण एकटेपणाने घेरलेली आहे. अठरा ते 34 वर्षे वयाचे 61 टक्के तरुण आणि पन्नास टक्के तरुणी एकेकटे राहत असल्याचे सरकारने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसले आहे.

जपानला भूकंपाचा धक्का

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 06:29

दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांना आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ६.८ इतकी भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे.