Last Updated: Tuesday, January 7, 2014, 16:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईएखाद्या व्यक्तीचा ड्युब्लिकेट असण्याचा फायदा असतो तसा तोटाही असतो. सुप्रसिद्ध मॉडेल आणि आपल्या विचित्र फोटोशूटमुळे प्रसिद्ध झालेली रोजलीन खान गेल्या काही दिवसांपासून विचित्र मेसेजने त्रस्त आहे. रोजलीन खानला सेक्स करण्यासंबंधी आणि त्यासाठी रेट सांगण्यासंदर्भातील अत्यंत अश्लिल असे मेसेज येत आहेत.
रोजलीन खानच्या सोशल मीडिया खात्यावर अशा प्रकारच्या मेसेजचा अत्यंत पाऊस पडला आहे. काही पुरूषांनी तिच्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोबदला म्हणून किंमत देण्याची तयारीही दर्शवली आहे. हे पाहून रोजलीन चक्रावून गेली आहे. यात काही तरी गडबड असल्याचे तिच्या लक्षात आले.
या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर कळाले की, रोजलीन खान हिच्या सारखी दिसणाऱ्या एक मुलगी देह व्यापार चालविण्यासाठी फोटो एडिट करून एका वेबसाइटवर टाकला. एवढेच नाही तर या मुलीने वेबसाइटवर रोजलीन खानचे नाव आणि संपर्क नंबरही टाकला. या वेबसाइटवरील जाहिरातीमुळे खोट्या रोजलीन खानला फायदा झाला पण खऱ्या रोजलीन खानची चांगली झोप उडाली आहे. या प्रकरणाची तक्रार खऱ्या रोजलीन खानने पोलिसांकडे केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 7, 2014, 16:08