कॅटसाठी जास्त रोमॅन्टिक कोण… सल्लू की रणबीर?, who is most romantic... salman or ranbir

कॅटसाठी जास्त रोमॅन्टिक कोण… सल्लू की रणबीर?

कॅटसाठी जास्त रोमॅन्टिक कोण… सल्लू की रणबीर?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लव्ह अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. पण, कतरिनानं मात्र या चर्चांना तोडत ‘मी सिंगल आहे आणि सध्या तरी माझा लग्न करण्याचा काही एक विचार नाही’ असं म्हटलंय.

मध्यंतरी स्पेनमध्ये सुट्टीदरम्यान रणबीर कपूरसोबत बिकनीमधले फोटो मीडियात पाहून कॅट चांगलीच लालेलाल झाली होती. आपल्या सुट्टीतील दिवसांना खाजगी क्षण सांगून आपल्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याचा सल्लाही तीनं मीडियाला दिला होता. यावर कॅट म्हणतेय, ‘मी फोटो बघितले आणि त्यावेळी मनातून प्रतिक्रिया निघाली... मी अस्वस्थ, दु:खी आणि संतापलेले होते... मला वाटलं की, तो माझा एक खाजगी क्षण होता आणि याबाबत गोपनियतेची अपेक्षा होती’.

‘पुन्हा जेव्हा कधी माझे फोटो काढायची योजना आखाल तेव्हा मला अगोदर जरूर कळवा... म्हणजे मी लाल रंगासोबत सफेद रंग (आपल्या बीकनीच्या रंगासंदर्भात) परिधान करणार नाही... पुढच्या वेळी मी मॅचिंग घालीन…’ असं उपहासात्मक पद्धतीनं कॅटनं म्हटलंय.

‘प्रत्येक जण एकटा अथवा विवाहित आहे... मी माझ्या मागे लागणाऱ्या लोकांची पर्वा करत नाही... सेलिब्रिटींनाही सर्वांप्रमाणे एक वेगळं व्यक्तीमत्व आहे’... असं म्हणत ‘लग्न होइपर्यंत मी एकटीच आहे, हे माझं वाक्य आहे आणि आता प्रत्येक जण या वाक्याचा वापर करत आहे. यावर माझा कॉपीराईट असायला हवा... पण, लग्न करण्याबाबत मी काही ठरवले नाही’ असंही तीनं यावेळी म्हटलंय.

यावेळी, रणबीर कपूर सोबत आपल्या साखर पुड्याबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना मात्र तिने कानामागे टाकलं. कॅटचा एकेकाळचा चांगला मित्र सलमान खान आणि आता रणबीर कपूर यांच्यापैकी कोण जास्त रोमॅन्टिक आहे? असा प्रश्न जेव्हा तिला विचारला गेला तेव्हा मात्र ‘मी एक दीर्घ आणि शांतीपूर्ण आयुष्य पसंत करीन’ असं उत्तर कॅटनं दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 17, 2013, 10:59


comments powered by Disqus