आणि अनुष्का शर्मा ढसाढसा रडली, Why cried Anushka Sharma

आणि अनुष्का शर्मा ढसाढसा रडली

आणि अनुष्का शर्मा ढसाढसा रडली
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूड अभिनेता आमिर खानप्रमाणे नव तारका अनुष्का शर्मा ढसाढसा रडली. राजकुमार हिरानी याच्यामुळे अनुष्का रडल्याचे सांगितले जात आहे. आमिर हा त्याच्या सत्यमेव जयते या टीव्ही शोमध्ये रडताना पाहिला आहे. मात्र, अनुष्काच्या डोळ्यात राजकुमारमुळे पाणी आल्याची घटना घडलीय.

‘रबने बना दे जोडी’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अनुष्का सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा आलेखही चढता आहे. हिंदी सिनेमांसाठी तिला ऑफर येत आहेत. करिअरमध्ये चांगली संधी असताना अनुष्का का रडली. तिच्या डोळ्यात राजकुमार हिरानी यांनी का आणले पाणी, असे प्रश्न पडले असतील ना. परंतु अंदर की बाद वेगळी आहे.

राजकुमार यांनी अनुष्काला ऑफर दिलेय. ‘पिके’ या आगामी सिनेमासाठी अनुष्काला संधी मिळाल्याने ती नाचायलाच लागली. अनुष्का इतकी आनंदी झाली की तिला अश्रु आवरता आले नाहीत. दोन्ही डोळे पाणावले. मला ‘पिके’ मिळालाय, अशी आता सांगत सुटलेय. कारणही तसच आहे, आमिर खान तिचा आवडता हिरो आहे. ‘पिके’मध्ये आमिर असल्याने अनुष्काला तिच्याबरोबर काम करण्यास मिळत असल्याने ती खूप आनंदीत आहे.

थ्री इडियट्स हा सिनेमा हिट ठरलेला आमिर आणि राजकुमार हिरानी यांनी सोबत काम करण्याचे ठरविलेय. मला हिरानी यांचा फोन आला यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचे नाव माझ्या मोबाईलवर पाहून धक्काच बसला. मी लगेच देवाचे अभार मानले. सोने पे सुहागा...अशीच माझी पहिली प्रतिक्रिया होती, असे अनुष्का सांगते.

ज्यावेळी राजकुमारचा फोन आला त्यावेळी मी एका सिनेमाच्या ट्रायलसाठी थिएटरमध्ये होती. मात्र, ज्यावेळी मी थिएटरच्या बाहेर पडले त्यावेळी शॉकच बसला. स्वत: राजकुमार हिरानी बाहेर उभे राहून माझी वाट पाहत होते. त्यांनी मला पाहिले आणि विचारले तु का रडतेस? मी पहिलांदा नाही नाही असं म्हटलं. पुन्हा त्यांनी मला तोच प्रश्न केला त्यावेळी मी सांगितले स्वत:ला रोखू शकले नाही आणि ढसाढसा रडले. त्यावेळी त्यांनी मला मिठ्ठीत घेतले आणि मला संभाळले. त्यांनी मला फोन करण्याचे वचन दिले आणि निघून गेले राजकुमार, असे अनुष्का सांगते.

रब ने बना दी जोडीच्यावेळी जसी त्यांची भावना होती. तिच भावना मला पुन्हा अनुभवायला मिळाली. मी चित्रपट साईन केल्यानंतर कारमध्ये गेली आणि कारमध्ये नाचायला लागले आणि माझ्या ड्राव्हरला बक्षिस दिले.

First Published: Tuesday, February 19, 2013, 18:41


comments powered by Disqus