रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड YJHD breaks Dabangg 2`s record

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

३१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या `य़े जवानी है दिवानी` सिनेमा १०० कोटी क्लबच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. या वीकेण्डमध्येच `ये जवानी है दिवानी` सिनेमाने ६२.७५ कोटींचा बिझनेस करत बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे. पहिल्या ३ दिवसांतच सुमारे ६३ कोटींची कमाई करत या सिनेमाने सलमानच्या `दबंग २` चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

`ये जवानी है दिवानी` सिनेमाने रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी १९.४५ कोटी रुपयांची कमी केली. तर शनिवारी २०.१६ कोटी रुपये आणि रविवारी २२.५० कोटी रुपये कमावले आहेत. या सिनेमाने देशभरातच नव्हे, तर परदेशातही जोरदार कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाने `दबंग २` सनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. हिच घोडदौड कायम ठेवल्यास `एक था टायगर`च्या कमाईचे रेकॉर्ड्सही हा सिनेमा मोडू शकतो.

२०१२ साली अनेक सिनेमांनी १०० कोटींचा गल्ला मिळवला होता. मात्र २०१३ साली अद्याप कुठल्याच सिनेमाने १०० कोटींची कमाई केलेली नाही. या वर्षी आलेल्या सिनेमांपैकी सर्वाधिक धडाकेबाज ओपनिंग याच सिनेमाला मिलाल्याचं ट्रेड पंडित तरण आदर्श यांचं म्हणणं आहे. रणबीरच्या `बर्फी` या सिनेमाने गेल्यावर्षी १०० कोटींचा बिझनेस केला होता. या वर्षी जर ये जवानी है दिवानीने १०० कोटींची कमाई केल्यास ही त्याची दुसरी फिल्म ठरेल जिने १०० कोटींची कमाई केली आहे. एवढी कमाई करणारा सध्याच्या काळातला रणबीर कपूर हा सर्वंत तरुण अभिनेता ठरला आहे.

First Published: Monday, June 3, 2013, 16:40


comments powered by Disqus