रेकॉर्डब्रेक... ‘ये जवानी है दिवानी’ बंपर हीट!, YJHD enter in 100 crore club

रेकॉर्डब्रेक... ‘ये जवानी है दिवानी’ बंपर हीट!

रेकॉर्डब्रेक... ‘ये जवानी है दिवानी’ बंपर हीट!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोन यांचा ये ‘ये जवानी है दिवानी’ यशाची एक एक पायरी पादाक्रांत करताना दिसतेय. या सिनेमानं मागचे सगले रेकॉर्ड मोडत एका आठवडयाच्या अगोदरच १०० करोडच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.

सिनेमाचं ओपनिंग तर शानदारचं राहिलं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसी या सिनेमानं १९.४५ करोड रुपयांचा गल्ला गोळा केला. तर आठवड्याच्या शेवटी तब्बल ६२.११ करोड रुपयांची कमाई या सिनेमानं केलीय. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमासाठी सिनेमाघरांमध्ये मोठी गर्दी दिसतेय.

व्यावसायिक तज्ज्ञ तरन आदर्श यांनी या सिनेमाच्या यशाबद्दल ट्विट केलंय. त्यात ते म्हणतात, ‘ये जवानी है दिवानी’नं १०० करोड रुपये कमावलेत. हा सिनेमा बंपर हिट झालाय’.


हा रोमांटिक सिनेमा ३१ मे रोजी सिनेमाघरांमध्ये दाखल झालाय. प्रेक्षकांना खास करून तरुण प्रेक्षकांना हा सिनेमा भलताच आवडलाय, असं दिसतंय. करण जोहर हा या सिनेमाचा निर्माता आहे. सिनेमात रणबीर, दीपिका यांच्याशिवाय कल्की कोचलिन आणि आदित्य राय कपूर यांनीही भूमिका निभावल्यात.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 7, 2013, 21:46


comments powered by Disqus