युक्ता मुखीचा कायदेशीर घटस्फोट Yukta & Tuli part ways, HC accepts terms for divorce

युक्ता मुखीचा कायदेशीर घटस्फोट

युक्ता मुखीचा कायदेशीर घटस्फोट

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

माजी विश्‍व सुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखी आणि प्रिन्स टुली यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. हे दोघे कायदेशीर विभक्त झाले आहेत. दोघांमध्ये झालेल्या कराराला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलीय.

युक्ता आणि टुली कोणकोणत्या अटीवर विभक्त राहणार आहेत असा गोपनीय अहवाल, न्यायालयाने नेमलेले वकील राजीव पाटील यांनी न्यायालयात सादर केला.

युक्ता आणि टुली यांचा विवाह नोंव्हेंबर २००८ मध्ये झाला होता. मात्र त्यांच्यात लगेचच वाद निर्माण झाले. युक्ता मुखीने टुली मारहाण करतो, असा आरोप केला होता. १६ मे, २०१३ रोजी टुलीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता.

न्यायाधीश भाटकर यांनी अहवाल स्वीकरुन, टुलीला जामीन मंजूर केलाय. युक्ताने टुलीविरोधात घरगुती हिंसा याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

याआधी राजीव पाटील यांनी पती-पत्नी यांच्यात परस्पर समन्वयाने एक मैत्रीपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

उच्च न्यायालयात टुलीला घरगुती हिंसाची तक्रार दाखल रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल. टुलीचे वकील फिलजी फ्रेडरिक यांनी सांगितलं की, युक्ता मुखीला यावर `ना हरकत प्रमाणपत्र` सादर करावं लागेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 11:21


comments powered by Disqus