सचिनची कसोटी, भारत-वेस्ट इंडिज ईडन गार्डनवर भिडणार, 1st Test: India v West Indies at Kolkata

सचिनची कसोटी, भारत-वेस्ट इंडिज ईडन गार्डनवर भिडणार

सचिनची कसोटी, भारत-वेस्ट इंडिज ईडन गार्डनवर भिडणार
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

`सिटी ऑफ जॉय` अशी ओळख असलेल्या कोलकात्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिली टेस्ट रंगणार आहे. नुकतीच कांगारुविरुद्ध वन-डे सीरिज जिंकलेल्या टीम इंडियाचं पारड वेस्ट इंडिजच्या तुलनेत जड वाटत आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची ही १९९वी टेस्ट असणार आहे. म्हणूनच ही टेस्ट ऐतिहासिक ठरणार आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान कोलकात्यातील ईडन गार्डनवर पहिली टेस्ट रंगणार आहे. टेस्ट जरी दोन टीममध्ये रंगणार असली तरी अर्थातच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच...सचिन आपल्या करियरमधील १९९वी म्हणजे सेकंड लास्ट टेस्ट खेळणार आहे. यामुळेच या टेस्टला एक वलय प्राप्त झालय. कोलकाता सचिनमय होऊन गेलय. तर टीम इंडिया फॉर्ममध्ये आहे. अशा दबावाच्या वातावरणामध्ये विंडिजला आपली छाप सोडण जरा आव्हानात्मकच ठरणार आहे. भारतातील ईडन गार्डन हे सचिनचं आवडत ग्राऊंड आहे. आपल्या या आवडत्या ग्राऊंडवर सचिन किती रन्स करतो याकडेच तमाम क्रिकेटविश्वाच लक्ष लागून राहिल आहे.

विंडिजने तर सचिनला पहिल्याच बॉलवर आऊट करण्याची स्ट्रेटेजी आखलेली आहे. आता त्यांची रणनीति यशस्वी ठरते का हे बघाव लागेल. शिखर धवन आणि मुरली विजय टीम इंडियाची ओपनिंग करतील. चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर,विराट कोहली, धोनीवर मिडल ऑर्डरची भिस्त असेल. सध्या तूफान फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला सहाव्या स्थानी संधी देण्यात येईल. टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप तगडी आहे. यामुळेच विंडिजच्या बॉलर्ससमोर भारतीय बॅट्समनचं आव्हान असेल.

डॅरेन सॅमीसमवेत टिनो बेस्टवर फास्ट बॉलिंगची मदार असेल. केमर रोच दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्यांची बॉलिंग लाईन अप अधिकच कमकुवत झाली आहे. याशिवाय वीरासॅम्मी परमॉल आणि शेन शिलिंगफोर्ड या नवख्या फिरकीपटूंचाही कस लागणार आहे. केवळ विंडिजचीच नव्हे तर भारतीय बॉलिंग डिपार्टमेंटदेखील कमकुवतच आहे. भारताच्या फास्ट बॉलिंगला तर अक्षरश: घरघर लागली आहे. आता ईशांत शर्मा आणि उमेश यादव या दोघांपैकी एकला आणि मोहम्मद शमी किंवा भुवनेश्वर कुमारला लास्ट इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. तर आर. अश्विनच्या फिरकीला डावखु-या प्रग्यान ओझाच्या फिरकीची साथ असू शकेल.

भारतीय बॉलर्ससमोर विंडिजचा तडाखेबंद बॅट्समन ख्रिस गेल आणि प्रॅक्टीस मॅचमध्ये सेंच्युरी झळकावलेल्या शिवनारायण चंद्रपॉलच प्रामुख्याने आव्हान असेल....कोणीही कसाही परफॉमन्स करो मात्र, कोणत्याही परिस्थितीत कोलकाता टेस्ट जिंकून धोनी एँड कंपनीने सचिनला विजयी भेट द्यावी अशीच इच्छा तमाम सचिन फॅन्स व्यक्त करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 5, 2013, 18:53


comments powered by Disqus