Last Updated: Thursday, January 24, 2013, 07:47
www.24taas.com,मोहालीइंग्लंडडविरुद्ध चौथ्या एक दिवसीय सामन्या त भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत मालिका खिशात टाकली. सुरेश रैनाच्या नाबाद ८९ आणि रोहित शर्माच्याद ८३ रन्सच्या जोरावर भारताने विजय सहज साकारला.
भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. गौतम गंभीर २० रन्सवर बाद झाला होता. त्यानंतर विराट कोहली २६ आणि युवराज सिंग ३ रन्स काढून परतले. त्यावेळी रोहित शर्माने खंबीरपणे फलंदाजी केली. त्याहने ८३ रन्सची चांगली खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर सुरेश रैनाने डावाची सूत्रे हाती घेतली.
महेंद्रसिंग धोनीच्यात साथीने त्या्ने ५५ रन्सची भागीदारी करुन भारताची धावसंख्याच २०० च्याय पुढे नेली. त्यानंतर धोनी १९ रन्सवर बाद झाला. त्यायनंतर जडेजाच्याय साथीने रैनाने विजय साकारला. रैनाने जीवदानाचा लाभ उठवत ७९ चेंडूत ८९ रन्सची जबरदस्त खेळी केली.
फॉर्मात आलेल्या रोहित शर्माला स्टी९व्हन फिनने ८३ रन्सवर पायचीत केले. रोहित शर्मा कमनशीबी ठरला. त्याटने १ षटकार आणि ११ चौकारांसह खेळी केली. सुरेश रैनासोबत त्याने ५१ चेंडूमध्येय ६८ रन्सची भागीदारी केली. रोहित शर्माने सलामीला येऊन अर्धशतक ठोकले. दुस-या बाजूने ३ विकेट गेल्या असताना त्याअने चांदगली फलंदाजी केली. जेड ट्रेडवेलनेच युवराज सिंगची तिस-यांदा लक्ष्य केलं. घरच्यां मैदानावर युवराज चाचपडत खेळला. त्याने ३ रन्स केल्या.
टीम इंडियाला दुसरा धक्का विराट कोहलीच्या रूपाने बसला. रोहित शर्मासोबत दमदार अर्धशतकी भागीदारी रोहितने केली. परंतु, ट्रेडवेलच्याय एका धीम्याब चेंडूवर तो फसला. विराटने २६ धावा काढल्या. भारतीय संघाला डावाच्याद सुरुवातीलाच पंचांच्यार चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. गौतम गंभीरला पंचांनी झेलबाद ठरविले.
First Published: Wednesday, January 23, 2013, 20:20