Last Updated: Saturday, December 28, 2013, 23:06
www.24taas.com, वृत्तसंस्था, मेलबर्नइंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन अॅलेस्टर कूक यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात आठ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड कूकनं मोडीत काढला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये ४१ रन्स करताच कूकनं टेस्ट कारकिर्दीत आठ हजार धावांचा टप्पा गाठला. कूकनं वयाच्या २९व्या वर्षी हा टप्पा गाठला. आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरनंही २९व्या वर्षीच आठ हजार रन्स केले होते. मात्र कूक सचिनच्या तेव्हाच्या वयापेक्षा २१ दिवसांनी लहान आहे.
एकूणच काय सचिनच्या रेकॉर्ड मोडत कूक सर्वात कमी वयात आठ हजार रन्स बनवणारा क्रिकेटपटू ठरलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 28, 2013, 23:06